alliance between bjp and shiv sena
   दिनांक :16-Feb-2019
मुंबई,
 
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना आणि भाजपा युतीनेच लढविणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जागावाटपावरून निर्माण झालेले मतभेद संपुष्टात आले असून, लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23 व भाजपा 25 जागांवर, तसेच विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागांवर लढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
 
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पुढील आठवड्यात मुंबईत येणार असून, मातोश्रीलाही भेट देणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर जागांबाबतची औपचारिक घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

 
 
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर भेट दिली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील भाजपा-शिवसेना युतीच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून, भाजपा 25 व शिवसेना 23 जागा लढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले होते. विधानसभेसाठी दोन्ही पक्ष समसमान म्हणजेच प्रत्येकी 144 जागांवर लढण्यावर एकमत झाले आहे. सोबतच, पालघरच्या जागेबाबत शिवसेनेची मागणीही भाजपाने मान्य केली असून, ही जागा शिवसेनेसाठी सोडल्याचे सूत्रांनी सांगितले.