america-mexico border wall building
   दिनांक :16-Feb-2019
  वॉिंशग्टन, 
 
अमेरिका-मेक्सिको सीमेवर िंभत बांधण्याची आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आपण देशात आणिबाणी जाहीर करीत आहोत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक‘वारी जाहीर केले. या घोषणेमुळे ट्रम्प यांना िंभत उभारण्यासाठी निधी उभारणे शक्य होणार आहे.
 
 

 
 
 
 
 
ट्रम्प यांनी याबाबतचे संकेत काही दिवसांपूर्वीच दिले होते. त्यावर ट्रम्प यांच्यावर टीका होत असतानाच ही घोषणा करण्यात आली आहे. ट्रम्प यांना कायदेशीर आव्हानालाही तोंड द्यावे लागू शकते. देशातील अवैध प्रवासी हे देशावरील आक‘मण आहे, असे ट्रम्प यांनी वारंवार स्पष्ट केलेले आहे. सीमेवरील 322 किमी िंभतीसाठी आठ बिलियन डॉलर खर्च करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितलेले आहे. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे.
 
व्यापक विरोधानंतरही ट्रम्प िंभत उभारण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ट्रम्प यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्याने यात आपली हार होऊ नये, याची काळजी घेत त्यांनी आणिबाणी घोषित केली आहे. दरम्यान, ट्रम्प हे आणिबाणी जाहीर करणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर डेमोक‘ॅटिकने आरोप केला की, ट्रम्प हे आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत. ट्रम्प यांनी 2016 मध्ये िंभत उभारण्याचा शब्द दिला होता. या पार्श्वभूमीवर आजच्या घोषणेला महत्त्व आहे.