five people died chicago
   दिनांक :16-Feb-2019
शिकागो;
 
 
 
 
शहराच्या बाहेरील औद्योगिक वसाहतीत एका बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला. हा बंदुकधार एका कंपनीतील कर्मचारी होता. पोलिसांनी त्याला ठार मारले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. गॅरी मार्टिन असे बंदुकधार्‍याचे नाव आहे. त्याने केलेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले, तर काही जखमीही झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.