पुलवामा शहीदांच्या सन्मानार्थ दिडशे मिटरचा राष्ट्रध्वज घेऊन काढली रॅली - कडकडीत बंद पाळून केला हल्ल्याचा निषेध
   दिनांक :16-Feb-2019
मानोरा,
पाकीस्तान समर्थीत आंतकवाद्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या बीएसएफ च्या जवानांच्या सन्मानार्थ आतंकवादी आणि त्यांच्या समर्थकांचा निषेध म्हणुन मानोरा शहर पुर्णपणे बंद ठेवण्यात आले. दिडशे मिटरचा राष्ट्रध्वज घेवून सर्वपक्षियांच्यावतिने रॅली काढण्यात आली. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषाने नगरी दुमदुमून गेली होती. या बंदमध्ये व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत शहीदांना श्रध्दांजली अर्पण करुन दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.

 
 
 
प्रारंभी मानोरा येथील झेंडा चौकात शहर आणि तालुक्यातील राष्ट्रप्रेमी आणि विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या सामुहीक नेतृत्वात ही रॅली निघुन शहीद जवान अमर रहे च्या जयघोषात कारंजा चौकातील शिाजी पुतळ्याला प्रदक्षिणा तहसील कार्यालयात नेण्यात आली. आतंकवादी आणि त्यांना समर्थन देणार्‍या देशावर कारवाई करण्याचे निवेदन सर्वपक्षीय शिष्टमंडळाद्वारे तहसीलदार यांना देण्यात आले.
 
 
 
शहीद जवानांच्या सन्मानार्थ मानोरा येथील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने यावेळी बंद ठेवण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थी, विद्यार्थींनी व्यापारी, शेतकरी, शिक्षकांनी भाग नोंदवून शहीद जवानांना आदरांजली व्यक्त केली.