ल्टर होममधील महिलांचे लैंगिक शोषण मुझफ्फरपूरचे
   दिनांक :16-Feb-2019
मुझफ्फरपूर, 
 
मुझफ्फरपूर येथील शेल्टर होममध्ये लहान मुली व महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी बिहारचे मु‘यमंत्री नितीश कुमार आणि दोन वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या भूमिकेची सीबीआयने चौकशी करावी, असा आदेश विशेष पोक्सो न्यायालयाने आज शनिवारी दिला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
शेल्टर होममधील महिलांचे लैंगिक शोषण करण्यापूर्वी त्यांना नशा येणार्‍या औषधांचे इंजेक्शन ज्या महिला डॉक्टरकडून टोचली जात होती, तिने दाखल केलेल्या याचिकेवर विशेष न्यायाधीश मनोज कुमार यांनी उपरोक्त आदेश दिला आहे.
 
मुख्यमंत्री नितीश कुमार, मुझफ्फरपूरचे माजी जिल्हाधिकारी धर्मेंद्र िंसह, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अतुल कुमार, मुझफ्फरपूरचे माजी विभागीय आयुक्त आणि समाज कल्याण विभागाचे विद्यमान मु‘य सचिव यांची या प्रकरणातील भूमिका समोर आणण्याच्या दिशेने सीबीआयने अद्याप तपास केलेला नाही, असा आरोप अश्विनी असे नाव असलेल्या डॉक्टरने आपल्या याचिकेत केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष न्यायालयाने या सर्वांची भूमिका तपासण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यापासून दिल्लीच्या साकेत येथील विशेष पोक्सो न्यायालयात सुरू होणार आहे.