mahrashtra government plan in school timetable
   दिनांक :16-Feb-2019
मुंबई,
 
आत्मसंरक्षणाच्या प्रशिक्षणाचा समावेश शालेय अभ्यासक‘मात समावेश करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. यासंदर्भात पुणे येथील मार्शल आर्टच्या महिला प्रशिक्षक नेहा श्रीमल यांनी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. या याचिकेला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हे आश्वासन दिले.
 
 

 
 
 
 
राज्यातील सर्वच शाळांमध्ये आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात यावे, अशी याचिका नेहा श्रीमल यांनी चेंज डॉट ओआरजी या संकेतस्थळावर मागील वर्षी सप्टेंबरमध्ये टाकली होती. या मागणीला 1.38 लाख जणांनी पािंठबा दिला. बंगालमधील बिरभूम येथे एका तरुणीने तिला त्रास देणार्‍या तीन जणांना धडा शिकवून पोलिसांच्या हवाली केल्याचे उदाहरण त्यांनी या याचिकेत दिले होते. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुलींनाही सशक्त केले जाऊ शकते, असा संदेश या धाडसी मुलीने दिला आहे. घाबरून छेडखानीला बळी पडण्याऐवजी अशा स्थितीचा धैर्याने सामना करणे शक्य आहे, असे त्यांनी या याचिकेत म्हटले आहे.