विवेकी आक्रोशाची गरज!
   दिनांक :16-Feb-2019
काश्मिरातील पुलवामा येथील केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावरील आत्मघाती हल्ल्यात 40 जवानांना प्राण गमवावे लागल्यानंतर सारा देश दु:खाने स्तब्ध झाला. आज प्रत्येक भारतीयाच्या मनात क्रोध आहे, आक्रोश आहे. आपल्या घरातील एखादा कर्तृत्ववान पुरुष मरण पावल्याची भावना प्रत्येक कुटुंबात आहे. ज्या पाकिस्तानच्या समर्थनाने जैश-ए-मोहम्मद नामक दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला, त्या पाकिस्तानला कायम लक्षात राहील असा धडा शिकविण्याची मागणी प्रत्येक भारतीय, वेदनेने पिळवटून निघालेल्या हृदयातून करत आहे. भारताच्या प्रक्षुब्ध जनमानसाची नोंद भारत सरकारने घेतली आहे. सरकारला सुरक्षेच्या बाबीवर फार मोकळेपणाने बोलता येत नाही. त्यामुळे सरकारच्या वतीने ज्या संयमित व कठोर प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत.
 
 
 
 
 
भारत देश वेदनेने आक्रोशत असतानाच, भारतातीलच काही जण मात्र आनंदाने सुखावले आहेत. ही अत्यंत संतापजनक बाब आहे. यात नरेंद्र मोदींना राजकीय विरोध करणारे काही पक्षही सामील झाले आहेत, हीतर फारच दुर्दैवाची गोष्ट आहे. हरयाणातील िंजद लोकसभा मतदारसंघात मतदारांकडून हाग्या मार खाल्लेले कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना, नरेंद्र मोदींच्या ‘56 इंच’ छातीचा उल्लेख करून जी खिल्ली उडविली आहे, ती त्यांच्या अमानवी वृत्तीचे दर्शन घडविणारी आहे. एकेकाळचे कॉंग्रेसचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िंशदे यांनीही आपली मळमळ ओकत, ‘सर्जिकल स्ट्राईक’ची खूप बढाई मारल्यामुळेच ही घटना आपण ओढवून घेतली आहे, असे म्हटले. खरेतर, सुशीलकुमारांची लायकी काढायची आमची इच्छा नाही. कॉंग्रेसवाले या हल्ल्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, अशी मागणी करत आहेत. जबाबदारीच घ्यायची असेल, तर सर्वप्रथम कॉंग्रेसनेच ती आपल्या शिरावर घेतलेली बरी! 70 वर्षांपासूनचे जे पाप संपूर्ण देश भोगत आहे, ते कॉंग्रेसच्याच ‘कर्तृत्वा’चे आहे. या अक्षम्य गुन्ह्यासाठी कॉंग्रेसवाले किती प्रायश्चित्त घेणार, हे त्यांनी प्रथम सांगितले पाहिजे. बुडावर लाथ मारून जनतेने सत्तेतून हाकलले असले, तरी केलेल्या पापकृत्यांची जबाबदारी झटकता येणार नाही, हे कॉंग्रेसवाल्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.
 
 
 
 
 
गेली साडेचार वर्षे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमापार व देशांतर्गत दहशतवादाशी ज्या हिमतीने व मुत्सद्देगिरीने लढा चालविला आहे, त्याचे कौतुकच करायला हवे. परदेश दौर्‍याची टवाळी होत असतानाही, नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्याची फार मोठी कामगिरी केली आहे. आज पाकिस्तान, दारोदार भीक मागत िंहडत आहे. घेतलेल्या कर्जावरील व्याजही भरण्याची त्याची लायकी राहिलेली नाही. पाकिस्तानच्या सदैव पाठीशी राहणार्‍या श्रीमंत मुस्लिम देशांनाही मोदींनी भारताच्या बाजूला वळविले आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद संपुष्टात आणण्यात, या गोष्टीदेखील फार महत्त्वाच्या ठरणार आहेत. केवळ सीमेवर लढून अंतिमत: विजय मिळत नसतो. त्यासाठी बहुआयामी व्यूहरचनेची गरज असते. हे सर्व कॉंग्रेसवाले जाणत नसतील असे नाही. परंतु, एका भ्रष्ट परिवाराचे पाय चाटण्यातच आयुष्य घालविल्यामुळे या कॉंग्रेसवाल्यांचा विवेकही आंधळा झाला आहे. त्याचेच प्रत्यंतर या प्रतिक्रियांमध्ये दिसून येते.
आणखी एक धोकादायक, देशद्रोही जमात आपल्या भारतात अजूनही शिल्लक आहे व ती म्हणजे देहाने भारतात, पण मनाने पाकिस्तानात असलेले काही मुसलमान. या मुसलमानांना कालच्या हल्ल्याने झालेला आनंद लपविता आला नाही. टि्‌वटरवर आपला हा आसुरी आनंद त्यांनी मुक्तपणे व्यक्त केला आहे. यात अलिगड मुस्लिम विद्यापीठात शिकणारे काही विद्यार्थीदेखील आहेत. हे लोक अजूनही भारतात राहात आहेत आणि इथलेच अन्नपाणी खात, याच देशाशी हरामखोरी करत आहेत. या लोकांनाही पाठीशी घालणारी, त्यांची वकिली करणारी शहरी नक्षल्यांची पिलावळदेखील याच देशात आहे.
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादापेक्षा या लोकांचा देशांतर्गत धोका कमी लेखता येणार नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत सरकारला या घरभेद्यांशीही लढावे लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत नरेंद्र मोदी यांचे सरकार, दहशतवादाला काबूत आणण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे, याचे खरेतर कौतुक व्हायला पाहिजे. मूळ काश्मीरचे व आता केंद्रात राज्यमंत्री असलेले जितेंद्र िंसह यांची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. ते म्हणाले की, दहशतवादी युद्ध हरत चालले आहेत. सुरक्षा दलांनी काश्मिरातील दहशतवाद्यांना हुडकून ठार मारल्यामुळे दहशतवादी संघटना हादरून गेल्या आहेत. त्यामुळे अशा हल्ल्याकडे या संघटनांचा शेवटचा निकराचा प्रयत्न म्हणून बघायला हवे.
 
 
 
 
 
 
 
आज पंतप्रधानांनी समस्त भारतीयांच्या वेदनायुक्त आक्रोशाची दखल घेत, पाकिस्तानला करडा इशारा दिला आहे. पाकिस्तानचे नाव न घेता ते म्हणाले की, ज्यांनी कुणी हे कृत्य केले आहे, त्यांनी फार मोठी चूक केली आहे. या कृत्याची त्यांना जबर िंकमत मोजावी लागणार आहे. कोट्यवधी भारतीयांची वेदना व आक्रोश मनात दाबून ज्या संयमाने पंतप्रधानांनी हे शब्द उच्चारले आहेत, त्यावरून पंतप्रधान किती निश्चयाने आणि जबाबदारीने बोलत आहेत, हे लक्षात येईल. भारताचे सध्याचे पंतप्रधान, कॉंग्रेसच्या काळातील कणाहीन, लाचार पंतप्रधानांसारखे नाहीत. त्यामुळेच पाकिस्तानला धडा शिकविण्याचा त्यांनी जो निर्धार व्यक्त केला आहे, तो हवेत विरणारा नाही, हे भारतीयांनी आणि पाकिस्ताननेही लक्षात ठेवले पाहिजे!
तळहातावर प्राण घेऊन आपले सुरक्षा जवान शत्रूशी लढत असतात. कुठे काही झाले की त्यांचे प्राण जातात. परंतु, आमचे काय? आम्ही तर तुलनेने सुखासीन आयुष्य जगत असतो. परंतु, आमचेही काही कर्तव्य आहे की नाही? एखादी घटना घडली की, भावनेच्या भरात प्रतिक्रिया देऊन मोकळे होण्याने आपली जबाबदारी संपत नाही. ‘रक्ताचा बदला रक्ताने घ्या’, ‘मेट्रो िंकवा महामार्ग बांधणे थांबवून तो पैसा युद्धासाठी वापरा, पण पाकिस्तानला धडा शिकवा’, ‘लाहोर शहर बेचिराख करा’, ‘ताबडतोब संपूर्ण सैन्य पाकिस्तानात घुसवून तो देशच संपवून टाका’... अशा प्रतिक्रिया आम्ही दिल्या. या प्रतिक्रियांमागची भावना वेदनेची होती, आक्रोशाची होती, हे निश्चित. पण, वास्तवात असे वागणे शहाणपणाचे समजले जात नाही. कुठल्याही बिकट प्रसंगी आम्ही विवेक गमविता कामा नये. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करावे. ते कसे वागले, हे आठवले पाहिजे. कारण, शत्रूने निर्माण केलेल्या रणांगणावर आपण जायचे नसते. रणांगण आपण निर्माण करायचे असते आणि त्यावर शत्रूला येणे भाग पाडायचे असते. अफजलखानाला जावळीच्या खोर्‍यात मोठ्या हिकमतीने आणेपर्यंत, शिवाजी महाराज हेतुपूर्वक शांत राहिले. त्यानंतर त्यांनी खानाचा, त्याच्या लाखावर सैन्यासह तिथेच मुडदा पाडला.
 
 
 
 
 
म्हणून आपण थोडा संयम ठेवला पाहिजे. परंतु, संयम ठेवणे म्हणजे विसरणे िंकवा थंड होणे नाही. बोलल्याप्रमाणे वागणारे आपले पंतप्रधान असल्यामुळे, पाकिस्तानचे आणि या दहशतवाद्यांचे काय करायचे ते त्यांच्यावर निश्चिंतपणे सोडले पाहिजे. परंतु, एक नागरिक म्हणून आपण काय करू शकतो, याचा विवेकपूर्ण विचार करून तसे आचरण करणे, एवढे तर आपल्या हातात निश्चितच आहे. त्यावर लक्ष केंद्रित करणे, हीच काळाची गरज आहे!