पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पांढरकवड्यात आगमन
   दिनांक :16-Feb-2019
यवतमाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पांढरकवडा दाखल झाले आहेत. मोदींच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजण आणि लोकार्पण यावेळी करण्यात आले. सभेला महिलांनी मोठी गर्दी केली आहे. सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांची उपस्थिती आहे.
 
 
 
 

 
 
 
जिल्ह्यात सर्वाधिक महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ हजार १८ महिला बचत गट आहेत. रोजगार निर्मिती व महिलांना सक्षम करण्यासाठी हे बचतगट कार्य करत आहेत. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये घाटंजीतील एका बचत गटाचा उल्लेख करीत बकरीच्या दुधापासून साबण बनत असल्याचे मन की बातमध्ये सांगितले होते. याच प्रकारे मार्गदर्शन करणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या सभेसाठी महिलांनी गर्दी केली आहे. सभा शहरातल्या रामदेव बाबा मैदानावर होणार आहे.
 
याशिवाय त्यांच्या हस्ते रस्त्यांची कामे, घरकूल वितरण यांसारख्या विविध विकासकामांची पायाभरणी केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते निधींतर्गत बांधण्यात येणाऱ्या विविध रस्त्यांच्या कामांची पायाभरणी, यासोबतच नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेचे उद्घाटन, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश आणि लाभार्थ्यांना घरकूल वितरण, अजनी (नागपूर)-पुणे रेल्वेला व्हिडिओच्या माध्यमातून हिरवा झेंडा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोनती अभियानातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच धनादेशाचे वितरण यावेळी होणार आहे. यानंतर पंतप्रधानांचे भाषण होणार असून कार्यक्रमानंतर ते सकाळी ११.३० वाजता धुळ्याला जाणार आहेत.