CM in Yavatmal
   दिनांक :16-Feb-2019
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे महिला बचत गटांच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील महिला बचत गटांची यशोगाथा सांगितली. 16 तालुक्यांमध्ये 1320 गावांमध्ये आज सुमारे 74 हजार कुटुंबांना चांगले जीवनमान यामुळे प्राप्त होत आहे. हे महिला बचत गट केवळ स्वत:ची प्रगती करीत नसून, समाजाची आणि पर्यायाने देशाची प्रगती करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
 

 
 
मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात 34 हजार गावांमध्ये आज महिला बचत गटांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात 37,891 महिला बचत गट होते, ते आता 2,65,000 वर पोहोचले आहेत. यापूर्वी केवळ 3 लाख कुटुंबांना लाभ मिळायचा तो आता 35 लाख कुटुंबांवर पोहोचला आहे. महिला बचत गटांना शून्य टक्के व्याज दराने आज कर्जपुरवठा केला जात आहे आणि मला आनंद आहे की, या महिला घेतलेले पूर्ण कर्ज प्रामाणिकपणे परत करीत आहेत. महिला बचत गटांचा रिव्हॉलविंग फंड 60 हजार रूपये होता. तो आता 1 लाख रूपये इतका वाढविण्याची घोषणा करताना मला अतिशय आनंद होतो आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 2.65 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. राज्यातील आदिवासींचे 381 कोटी रूपयांचे खावटी कर्ज माफ करण्यात आले आहे. मंत्रालयात एक वेगळा कक्ष स्थापन करून आदिवासींमधील विविध जातींसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतील.