संग्रामपुर, चांगेफळ,वरवट बकाल, पातुर्डा, वानखेड, बावनबीर, टुनकी, सोनाळा, बंद
   दिनांक :16-Feb-2019
बुलडाणा(संग्रामपुर):-
जम्मु काश्मीरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकाळी 7 वाजतापासुन कडकडीत बंद ठेवून चौका चौकात पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या भारतीय सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी सर्व धर्मिय बांधवांच्यावतीने ठिकठिकाणी रस्त्यावरून रॅली काढण्यात आली.
 
 
 
 
तालुक्यातील टुनकी येथील ग्रामस्थांनी मुंडन करून दहशदवासी हल्याचा निषेध करुन पाकीस्तान मुर्दाबाद, अशा घोषणा देत गावांमध्ये कडकडीत बंद पाडण्यात आले. यावेळी अनेक व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवून शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली. यामध्ये सागर वावरे, संजय बावस्कार, विशाल जैस्वाल, अक्षय वाकोळे, गोपाल वावरे, गणेश थेरोकार, भिका लोनकर, राजु लोनकर यांच्यासह 35 युवकांनी टुनकी बस स्थानकांवर मुंडन करुन निषेध नोंदविला आहे. तालुक्यातील संग्रामपुर, चांगेफळ,वरवट बकाल, पातुर्डा, वानखेड, बावनबीर, टुनकी, सोनाळा सह इतर गावांमध्ये कडकडीत बंद पाडण्यात आले. तालुक्यात ठिकठिकाणी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ 'पाकिस्तान मुर्दाबाद' अशा घोषणा देण्यात आल्या. तालुक्यातील गावांमध्ये शुक्रवारी रात्री स्काँडल मार्च, निषेध रँली, व शहीद जवानांना श्रध्दांजली देण्याचे कार्यक्रम घेण्यात आले. हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्ल्याचा बदला नक्कीच घेतला पाहिजे आणि पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे.