सायनाचे जेतेपद कायम, सौरभ वर्माला तिसर्‍यांदा राष्ट्रीय जेतेपद- राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडिंमटन स्पर्धा
   दिनांक :16-Feb-2019
गुवाहाटी,
फुलराणी सायना नेहवालने पुन्हा एकदा पी.व्ही. िंसधूवर 21-18, 21-15 असा विजय नोंदवून आपले महिला एकेरीचे राष्ट्रीय विजेतेपद कायम राखले आहे. सायनाने चौथ्यांदा राष्ट्रीय विजेतेपदाचा मान मिळविला. पुरुष गटात अनुभवी सौरभ वर्माने युवा सहकारी खेळाडू लक्ष्य सेनला तंत्रशुद्ध बॅडिंमटनचे धडे देत आपले तिसरे वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडिंमटन स्पर्धेचे अिंजक्यपद पटकावले.
 
 
 
सामन्याच्या प्रारंभी िंसधूने उत्कृष्ट खेळ करत 4-2 अशी आघाडी घेतली, परंतु सायनाने जोरदार मुसंडी मारत पहिल्या गेममध्ये 5-5, पुढे 9-9 अशी बरोबरी मिळविली. मात्र त्यांनी सायनाने ब्रेकमध्ये 11-10 अशी निसटती आघाडी मिळविली होती. ब्रेकनंतर दोन गुण घेत सायनाने आघाडी 15-11 अशी केली. नंतर सायनाने आपली आघाडी 18-15 अशी वाढविली. तिला पहिला गेम खिशात घालण्यासाठी केवळ तीन गुणांची गरज होती व सायनाने जोरदार फटकेबाजी केली, परंतु िंसधूकडे त्याचे प्रत्युत्तर नव्हते. सायनाने पहिला गेम 21-18 असा िंजकला.
 
 
 
दुसर्‍या गेममध्ये सुरुवातीला िंसधूने आक्रमक खेळ करत 5-3 अशी आघाडी घेतली, परंतु सायनाने आपल्या ठेवणीतले फटके मारत 7-7 अशी बरोबरी साधली व पुढे 11-9 अशी दोन गुणांची आघाडी मिळविली. सायनाच्या आक्रमक खेळासमोर िंसधूचे काहीएक चालले नाही. सायनाने 14-11, 18-13 अशी आपली आघाडी कायम राखत दुसर्‍या गेमसह हा निर्णाययक सामना िंजकला.
 
 
 
गुवाहाटी येथील टीआरपी स्टेडियममध्ये शनिवारी रंगलेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात 26 वर्षीय सौरभ वर्माने 44 मिनिटात लक्ष्य सेनवर 21-18, 21-13 एकतर्फी विजय मिळविला. यापूर्वी दोघेही चारवेळा एकमेकांसमोर ठाकले होते व चारही सामने सौरभनेच िंजकले. लक्ष्य सेनने उपांत्य सामन्यात पी. कश्यपवर विजय नोंदविला.
 
 
दोन वर्षांपूर्वी पाटणा येथे सौरभ वर्माने लक्ष्य सेनवर मात करून आपले दुसरे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते.
तत्पूर्वी, पुरुषांच्या दुहेरीच्या सामन्यात चिराग शेट्टी व प्रणव जेरी चोपडा या जोडीने आपले अनुभव पणाला लावून श्लोक रामचंद्रन व अर्जुन एम.आर. जोडीवर 33 मिनिटात 21-13, 22-20 अशी मात केली.