तिरंगा
   दिनांक :16-Feb-2019
पुलगाव येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी येथील व्यापाऱ्यांनी आज शनिवारी बाजारपेठ कडेकोट बंद ठेवून निषेध नोंदविला.
 
 

 
 
 
नगरात सकाळीच आज चौकात विविध पक्षाचे युवा कार्यकर्ते गोळा झाले.व त्यांनी काल ठरल्याप्रमाणे बंद पुकारला.या बंदला व्यापाऱ्यांनी ही चांगला प्रतिसाद दिला.सकाळीच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळा शहागडकर, माजी नगराध्यक्ष मनीष साहू,चंद्रकांत पवार,भाजप व्यापारी आघाडीचे सुधीर बांगरे, सनी ढोमने,रज्जाक बेग,रिकू,विशाल हर्षे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शाम देशमुख,राजाभाऊ लोहकरे, सर्व पक्षाचे युवक व मुस्लिम युवा कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
 
 
 
या युवकांनी हातात तिरंगा घेऊन नगर भ्रमण केले.व पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावले.व्यापाऱ्यांनी बंदला चांगला प्रतिसाद दिला. पुलवामा घटनेच्या निषेधार्थ युवकांनी बाजारपेठ बंद करून मोर्चा काढला.