सोळंकी, झरीनची आगेकूच- स्ट्रॅण्डजा स्मृती बॉक्सिंग
   दिनांक :16-Feb-2019
नवी दिल्ली,
बल्गेरियाच्या सोफिया येथे आयोजित प्रतिष्ठेच्या 70 व्या स्ट्रण्डजा स्मृती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत राष्ट्रकुलचा सुवर्णपदक विजेता गौरव सोळंकी (52 किग्रॅ) याने पुरुषांच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर माजी विश्व ज्युनियर महिला विजेती निखात झरिन (51 किग्रॅ) हिनेही महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
 
 
 
आपल्या पहिल्या लढतीत झरीनने इटलीच्या जिओव्हॅन्ना मार्शीवर मात केली. सलामीच्या लढतीत सोळंकीने अमेरिकेच्या अब्राहम पेरेझ याच्यावर वर्चस्व गाजविले. सोळंकीने इंडिया ओपनमध्ये सुद्धा सुवर्णपदक पटकावले. तसेच गतवर्षी सोळंकीने केमिस्ट्री चषक स्पर्धेतही सुुवर्णपदकाचा मान मिळविले होता.आता अंतिम सोळामध्ये सोळंकीला कझाकस्तानच्या अन्वर मुझापारोव्हविरुद्ध खेळावे लागणार आहे.
 
 
अनेकवेळा राष्ट्रीय पदक िंजकणारी झरीन पुढील फेरीत बेलारूसच्या याना बरीमविरुद्ध खेळणार आहे. गतवर्षी उलान बटार चषक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अंकुश दहिया (60 किग्रॅ) याने या स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
महिलांच्या 60 किग्रॅ वजनगटात नीरजने बल्गेरियाच्या अस्लहान मेहमेडोव्हावर विजय संपादन केले.