दोन राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्र सायबरचा गौरव
   दिनांक :16-Feb-2019
मुंबई, 
 
माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नाविन्यपूर्ण उपक‘म राबविल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर प्रकल्पाला देशपातळीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. कोची येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 
 
 
 
 
कोची येथे ‘द ओपन ग‘ुप अवार्ड फॉर इनोव्हेशन अँड एक्सलन्स’ परिषदेत महाराष्ट्र सायबरला डिजिटल सिक्युरिटी विभागातील मानाचा ‘द प्रेसिडेंटस वार्ड’ प्रदान करण्यात आला; तर अॅम्बिस प्रणालीला ‘डॉक्युमेंट मॅनेजमेंट’ विभागातील पुरस्कार देण्यात आला.
 
 
या परिषदेत महाराष्ट्र सायबरच्या डिजिटल क‘ाईम युनिटला डिजिटल सिक्युरिटी श्रेणीत मानाचा ‘द प्रेसिडेंट वार्ड’ घोषित झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पायरसी रोखण्यासाठी व माहितीच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सायबरने केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह , अधीक्षक बाळिंसह रजपूत यांच्यावतीने पोलिस निरीक्षक लक्ष्मण कांबळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद जोशी, शिपाई विवेक सावंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.