वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू - ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना - घटनास्थळावर तणावपूर्ण स्थिती
   दिनांक :16-Feb-2019
चंद्रपूर,
शेतकाम करीत असलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवार, रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा गावाजवळील पद्मापूर-बल्लारपूर येथे घडली. सुभद्रा गेडाम असे मृतक महिलेचे नाव आहे.
 

 
 
 
ब्र्रम्हपुरी तालुक्यातील हळदा परिसरात मागील काही दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या हैदोसाने नागरिक भयभीत झाले आहेत. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी नुकतीच मानव हक्क परिषद घेवून शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. या परिसरातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली अहे. शनिवारी सुभद्रा गेडाम हि महिला स्वतःच्या शेतात लाखोळी काढण्यासाठी गेली होती. हा परिसर जंगलव्याप्त असल्याने वन्यप्राण्यांचा वावर असतो. शेतालगत दबा धरून बसलेल्या वाघाने सुभद्रावर हल्ला चढवून नरडीचा घोट घेतला. या घटनेची माहिती मिळताच गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून वनाधिकार्‍यांना माहिती दिली. घटनास्थळावर तणावपूर्ण स्थिती कायम होती.