टेक्निकल जडणघडण
   दिनांक :17-Feb-2019
‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ या क्षेत्रातील आजवर झालेली प्रगती आणि जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्था या दोन्ही गोष्टी सोबत अभ्यासल्या, तर आपल्याला असं दिसून येतं की, भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये सर्वाधिक प्रमाणावर तंत्रज्ञानासाठी मानव संसाधन पुलाचे खर्‍या अर्थाने जागतिकीकरण झाले आहे. शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आणि विशेषतः तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण घडामोडीमध्ये भारतीयांचा समावेश आहे. रिसर्च, डेव्हलपमेंट, इनोव्हेशन्स आणि एंटरप्रेन्युअरशिप या सर्वच बाबींमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील भारतीय विद्यार्थ्यांनी विशेष चुणूक दाखवल्यामुळे, अमेरिकेने आणि काही महत्त्वपूर्ण देशांनी भारतासोबत अनेक ठिकाणी सामंजस्य करार करण्यात आणि कोलॅबोरेटीव्ह अॅक्टिव्हिटीजमध्ये स्वारस्य दाखवले आहे.
 
तंत्रज्ञानातील नवनवीन बदल सातत्याने नवकल्पनांचं स्वागत करण्यास उत्सुक आहे. डिजिटल, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सॉफ्ट कॉम्प्युिंटग, वायरलेस कम्युनिकेशन्स आदी तंत्रज्ञानातील पुढील जनरेशन नवीन आव्हानं समोर ठेवत आहेत. सामंजस्य कराराचे ड्राफ्टस्‌ तयार आहेत. भारतातील अभियांत्रिकी संस्था या करारावर सह्या करण्यास उत्सुक आहेत. मात्र सर्वेक्षणात असं आढळून आलं, सामंजस्य करारासाठी वरच्या फळीने दाखवलेले औत्सुक्य फारसे फलदायी नाही, कारण ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या भरवशावर अॅकेडेमिक कोलॅबोरेशन्स करायचे आहे, ते आमचे शिक्षक आणि विद्यार्थी जागतिकीकरणाच्या झपाट्यातील ओघात पाहिजे त्या वेगाने समोर येऊ शकत नाहीये आणि तात्पर्याने पुढील काळातील तंत्रज्ञानातील आव्हानं पेलण्यास आमचा विद्यार्थिवर्ग सक्षम नाही. या परिस्थितीला केवळ विद्यार्थी जबाबदार आहेत का?
तुमच्या पायात किती महागाचे पादत्राण आहे, यापेक्षा तुमची वाटचाल किती दमदार आहे यावर लक्ष केंद्रित केलं, तर विकासाची शाश्वत पावलं देशाच्या उज्ज्वल भवितव्याकडे जातील, यात शंका नाही. 
 
डॉ. एपीजे अब्दुल कलाम म्हणतात,
व्हेन लर्निंग इज पर्पझफुल, क्रिएटिव्हिटी ब्लॉसम्स,
व्हेन क्रिएटिव्हिटी ब्लॉसम्स, िंथिंकग एमनेटस्‌
व्हेन िंथिंकग एमनेटस्‌, नॉलेज इज फुल्ली लिट
व्हेन नॉलेज इज लिट इन रियल सेन्स
इकॉनॉमी फ्लरीशेस...
त्यांचे कोटस्‌ मनात अधोरेखित झाले असले, तरी त्यांचे विचार आपल्या कृतीत उतरल्याखेरीज त्याचा अर्थ खर्‍या अर्थाने अनुभवणं संभवत नाही.
‘टीिंचग-लर्निंग’ या प्रोसेसला आपण अत्यंत आनंददायी आणि पर्पझफुल बनवलं, तर विद्यार्थ्यांना ते नक्कीच क्लेशकारी वाटणार नाही.
 
आपण जेव्हा शिक्षकीपेशा स्वीकारतो, तेव्हा तो केवळ एक उदरनिर्वाहाचे साधन वा ‘व्यवसाय’ म्हणून स्वीकारता कामा नये. ‘स्टुडण्ट-टीचर’ यांच्यातील दैनंदिन संवाद हा प्रभावी आणि फलदायी ठरेल, जेव्हा शिक्षक पित्याच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांशी वागतील, त्यांना विविध विषयांचे ज्ञान देताना सोबत नैतिक मूल्य रुजवतील, योग्य मार्गावर चालायला शिकवतील, त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वविकासासाठी झटतील.
विद्यार्थ्यांचे शाश्वत विकासाचे एकेक पाऊल पाडण्यासाठी शिक्षकांनी अविरत मेहनत घ्यायला हवी.
वर्गात सर्व विद्यार्थी समान बौद्धिक पातळीचे नसतात, मात्र शिक्षकांनी ‘वीक स्टुडंटस्‌’, ‘ब्राईट स्टुडंटस्‌’ असे त्यांचे वर्गीकरण करणे योग्य नाही. एखादा कन्सेप्ट फळ्यावर समजावून सांगण्यासाठी काही हुशार विद्यार्थ्यांना समोर बोलावल्यास त्याला निश्चितपणे प्रोत्साहन मिळेल. मात्र, साधारण मुलांनाही समोर येण्यास उद्युक्त करून त्याला प्रेझेंटेशनसाठी काही सूचना वा मदत केल्यास त्यांच्यात आत्मविश्वास येऊ शकतो. फक्त एक ते दोन मिनिटं विद्यार्थ्यांना बोलतं करण्याआधी डायसवर कसे उभे राहावे, बोलताना समोरच्या प्रत्येकाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी काय करावे, ‘आय कॉण्टॅक्ट’ कसा मेंटेन करावा, जेणेकरून वर्गातील प्रत्येकाला असं वाटावं की, थेट त्याच्याशी संवाद साधला जातोय! ‘पीच स्पीच’ इफेक्टिव्ह होण्यासाठी सुरुवात व शेवट कसा करावा, व्हॉईस मॉड्युलेशन कसे आणावे, आदिविषयक थोडं मार्गदर्शन केलं, तर मुलांच्या ‘प्रोफेशनल स्किल्स’ काही प्रमाणावर डेव्हलप होऊ शकतात. त्यांच्यात लीडरशिप क्वालिटीज, कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करण्यासाठी इतका ‘ट्रिगर’ पुरेसा आहे.
 
 
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंग विभागात ‘हेड ऑफ द डिपार्टमेंट’ या पदावर कार्यरत असताना काही बाबींवर माझं लक्ष केंद्रित केलं-
1. लेटेस्ट टेक्नॉलॉजी, ग्लोबल रेलेव्हन्स यानुसार विषयांचे आणि शिक्षकांचे वर्गीकरण केले. ‘फॅकल्टी लीडर्स’ तयार केले. त्यांना ग्रुपवाईज ग्रोथप्लॅन असाईन केला. टाईमलाईन टार्गेटस्‌ दिले.
2. ‘क्रिएटिव्हिटी अॅण्ड इनोव्हेशन्स’च्या कार्यशाळा घेऊन ‘इनोव्हेटिव्ह आयडिया बँक’ बनवून ‘मल्टिडिसिप्लिनरी मेगाप्रोजेक्ट’ हा कन्सेप्ट नव्याने रुजवला. ‘स्टुडंटस्‌ लीडरशिप’ वर्कशॉप्स घेतले.
3. शिक्षकांना रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट, टीिंचग-लर्निंगसाठी जास्तीत जास्त वेळ द्यायला सांगितले. रिसर्च क्लस्टर अॅक्टिव्हिटीज वाढवल्या. व्हर्च्युअल लॅब सेटअपसाठी एक्स्टर्नल कनेक्टस्‌ अॅस्टॅब्लिश करून फंिंडग प्रोपोझल्स सबमिट केले.
4. अमेरिका, रशिया, न्यूझीलंड आदी प्रगत देशांमधील प्रोफेसर्सना इन्व्हाईट करून सेशन्स, वर्कशॉप्स अरेंज केले.
5. इंडस्ट्री कनेक्टस्‌ वाढवले. त्यांचे एक्स्पर्ट सेशन्स, इंटरॅक्टिव्ह सेशन्स, वर्कशॉप्स, शॉर्ट टर्म ट्रेिंनग प्रोग्रॅम्स अरेंज केले.
6. ‘फॅकल्टी अॅडव्हायझर स्कीम’ला अर्थपूर्ण बनवण्यासाठी मी शिक्षकांना एक आवाहन केलं, तुम्हाला असाईन केली गेलेली मुलं संपूर्ण रीत्या घडवण्याची जबाबदारी तुमची. त्यांच्यासाठी नियमित वेळ द्या. ग्रुप मीिंटग्ज अरेंज करा. केवळ त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना त्यांचे फ्युचर प्लॅन्सविषयी विचारा. तुमचा अनुभव, रिसर्च त्यांना घडवण्यासाठी सार्थकी लावा. त्यांचे प्रोजेक्टस्‌ वैशिष्ट्यपूर्ण होऊ द्या. तुम्ही कॅॅटेलिस्टसारखी भूमिका पार पाडा.
 
यासह अनेक गोष्टी विभागपातळीवर राबवण्यामुळे सर्वांचा आत्मविश्वास वाढला. ‘ऑटोनॉमी एक्स्टेंशन कमिटी’ आणि ‘नॅशनल असेसमेंट अॅण्ड अक्रेडिटेशन कौन्सिल’ यांनी विभागाच्या एकंदरीत कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या ग्रॅज्युएशन सेरिमनीनंतर वा त्यांच्या सेंडॉफच्या वेळेस सामान्यतः संदेश दिला जातो,
‘इफ ...........या............. ड्रॉप ऑफ वॉटर फॉल्स इन अ लेक, देअर इज नो आयडेंटिटी. बट इफ इट फॉल्स ऑन लीफ ऑफ लोटस्‌, इट शाईन्स लाईक अ पर्ल. सो यु मस्ट सिलेक्ट अ प्रॉपर प्लेस, व्हेअर यु कॅन शाईन.
इफ यु वॉन्ट शाईन लाईक या सन, यु विल हॅव बर्न लाईक या सन.
पाऊस पडत असताना सामान्य पक्षी ओले होण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी आसरा शोधतात. गरुडाला मात्र ओले होण्याची िंचता नसते, कारण ढगांच्या कितीतरी वरच्या पातळीवर झेप घेऊन तो उडत असतो. तुमचे व्यक्तिमत्त्व या गरुडाप्रमाणे बनवा.
 
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, मात्र गगनभरारीचं वेड रक्तात असावं लागतं! आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही, हेच वाक्य वारंवार आठवतं. विद्यार्थ्यांना हे सर्व ‘शाब्दिक बुडबुडे’ वाटायला नको, म्हणून त्यांच्या पंखात गरुडझेपेचे बळ येण्यासाठी प्रयत्नांची निश्चितच आवश्यकता आहे.
‘आऊटकम बेस्ड एज्युकेशन (ओबीई) सिस्टीम’ लागू झाल्यामुळे एक व्यापक दृष्टिकोन ठेवून सर्वांना अध्यापन-शिक्षणप्रक्रियेत तसेच मूल्यांकन साधनांमध्ये लक्षणीय बदल करण्याच्या उद्देशाने लक्ष केंद्रित करणे भाग आहे.
लेखमालेतील मागील भाग ‘आत्मसंवाद, आत्मपरीक्षण आणि आत्मविश्लेषण’ यावर केंद्रित होता. प्रामुख्याने शिक्षक आणि विद्यार्थी हे देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण पायाभूत घटक असल्यामुळे त्यांच्या आत्मसंवादावर विशेष भर होता. मात्र, एका समृद्ध राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची फार मोठी भूमिका असली, तरीदेखील शिक्षणप्रणालीपुरती मर्यादित जबाबदारी त्यांची आणि प्रत्येक व्यक्तिमत्त्वात शिक्षक आणि विद्यार्थी, असे दोन व्यक्तित्व ‘बाय डिफॉल्ट’ वास्तव्य करून असल्यामुळे रचनात्मक कार्यद्वारे सर्जनशील पिढी घडवण्याचं, मानवी मूल्यांचा विकास करण्याचं आणि क्रियाशील, जागरूक नागरिक बनवण्याचं काम अर्थात प्रत्येकाचं आहे. आपण सर्वांनी स्वतःला सुसंस्कारित आणि कृतिशील बनवल्याखेरीज लर्निंग, क्रिएटिव्हिटी, िंथिंकग, नॉलेज या सर्व प्रवासाचे फलित अनुभवायला मिळणार नाही.
 
2013 मध्ये आपला भारत वॉिंशग्टन कराराचा चिन्हक सदस्य बनला आणि ‘परिणाम आधारित शिक्षणप्रणाली’ अर्थात ‘आऊटकम बेस्ड एज्युकेशन (ओबीई) सिस्टीम’ लागू झाल्यामुळे आम्हाला रुब्रिक्स तयार करून इव्हॅल्युएशन करणं क्रमप्राप्त आहे. भारतातील अनेक शैक्षणिक संस्था स्वायत्त झाल्या आहेत. त्यामुळे स्वतंत्र रीत्या काही निर्णय घेऊन शैक्षणिक प्रक्रियेत आवश्यक त्या सुधारणा त्वरेने होऊ शकतात.
संपूर्ण शैक्षणिक वातावरणात बदल होण्यासाठी आणि स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी आणि उद्योगांच्या बदलत्या अपेक्षांना तोंड देण्याच्या प्रक्रियेस समाविष्ट करण्यासाठीच्या योजनांची अंमलबजावणी करणे आपल्यासाठी शक्य आहे.
 शुभांगी रथकंठीवार
...............