हिरे आणि भारत : एक राजेशाही युती!
   दिनांक :17-Feb-2019
आकाशात चकमणार्‍या तार्‍यांप्रमाणेच पृथ्वीने, निसर्गाने आपल्या गर्भात तयार केलेले हे नैसर्गिक तारेच आहेत. ज्या गूढ कौशल्याने आणि ताकदीने हा निसर्ग, ही पृथ्वी एखाद्या सुरवंटाला फुलपाखरू होण्यास मदत करते, त्याच गूढतेने एखाद्या साध्या पदार्थापासून तितक्याच अचूकतेने पृथ्वी हिरे जन्माला घालते.
 
परंतु, फुलपाखरू आणि हिर्‍यांमध्ये एक मूलभूत फरक असतो, तो म्हणजे फुलपाखरू ठरावीक काळापुरतेच जिवंत राहते, तर हिरे कायमस्वरूपी चमकत राहतात. याच गुणधर्मामुळे हिरे हा सर्वात लोकप्रिय खडा बनला असून आपल्या अविनाशीपणाचे प्रतििंबबच या हिर्‍याच्या कडकपणात असते. त्याची चमक म्हणजे त्याच्या शक्तीचे आणि प्रकाशमयतेचे प्रतििंबब असते. आज, हिरा हे एखाद्याच्या व्यक्तिगत यशाचे द्योतक मानले जाते.
 
भारतीय राजांनी हिर्‍याला आपल्या आयुष्यात विशेष स्थान दिले होते. मुघलांच्या न्यायालयात अॅम्बेसिडर म्हणून रुजू असलेले सर थॉमस रो यांनी त्यांच्या ‘एम्बसी ऑफ सर थॉमस रो टू कोर्ट ऑफ ग्रेट मुघल, 1615-1619 अॅज नॅरेटेड इन हिस जर्नल अण्ड करस्पॉण्डन्स’ या अहवालात नमूद केले आहे की, जहांगीर हिर्‍यांनी मढलेले असत. 1625 पूर्वीच्या इतिहासाचे दर्शन घडवणार्‍या अनेक वस्तुसंग्रहालयांमध्येही भारतीय राजेशाही घराण्यांतील दागिन्यांत हिर्‍यांचे असाधारण महत्त्व दिसून येते. भारतीय राजांच्या तलवारी आणि अन्य हत्यारांनाही हिर्‍यांची सजावट असायची.

 
 
शाहजहानच्या दरबाराचे साक्षीदार असलेले अब्दुल हमीद लाहोरी सांगतात की, त्यांच्या दरबारातील मोराचे डिझाईन असलेल्या राजासनालाही असंख्य हिर्‍यांचे कोंदण लाभले होते. त्याची िंकमत त्या काळात होती ................ लाहोरी यांच्या निरीक्षणात 186 कॅरेट कोहीनूर हिर्‍यांचा समावेश होता. अकबर शहा हिरा ........... कॅरेटस्‌चा तर, शहा हिरा 88.77 कॅरेट होता. जहांगीर हिरा 83 कॅरेटस्‌चा होता. त्यांनी नमूद केलेल्या अन्य हिर्‍यांमध्ये केवळ एकच 352.50 कॅरेटस्‌चा सगळ्यात मोठा हिरा तैमूर रुबी हा होता. हा जगातला तिसर्‍या क्रमांकाचा सर्वांत मोठा हिरा होता.
केवळ मुघल राजवटीतच हिर्‍यांना पसंती होती, असे नव्हे. तंजोर िंकवा म्हैसूर राजवटीतला एक खंजीर सापडला असून, त्यावर िंसहाच्या तोंडाचा आकार कोरलेला आहे आणि त्या आकारात कुंदनयुक्त हिरे, रुपे आणि पाचू जडवण्यात आले आहेत.
 
गोवळकोंडा येथील खाणींमध्ये हैदराबादच्या अनेक जुन्या राजेशाही घराण्याच्या वस्तू सापडल्या आहेत. यात सोन्याच्या पेट्यांना हिर्‍यांच्या कडा लावलेल्या दिसून येतात. तसेच, हिरे-रत्नजडित सोन्याचे बाऊल्स आणि त्याला साजेसे स्टॅण्डस्‌ही या ठिकाणी मिळाले आहेत. हे सर्वसाधारण 1700 च्या शतकातले असावे आणि अर्थात, निजामशाही घराण्यातल्या हिर्‍यांच्या कलेक्शनने तर उरले
ला सगळा भारत विकत घेतला असता, इतकी हिर्‍यांची संपत्ती त्यांच्याजवळ होती.
 
टिपू सुलतानाच्या िंसहासनाला सुशोभित करण्यासाठी कुंदन हिर्‍यांसह कॅबेकॉन रुबी आणि माणके वापरण्यात आली होती. त्यानंतर 1800 च्या शतकात तर हिरे ही अपरिहार्य वस्तू बनली. प्रत्येक राजवटीत अंकुशापासून पैंजणापर्यंत सगळ्या वस्तू आणि दागिन्यांमध्ये हिरे अनिवार्य झाले. अरकोट येथील नवाबाने लॉर्ड क्लिव्ह यांना त्यांच्या भारतभेटीदरम्यान अद्वितीय कोंदण असलेले हिरे भेट म्हणून दिले, त्याचा उल्लेख इतिहासकारांनी केला आहे. त्यानंतर, अरकोट हिरे क्लिव्हने आपल्या राणी शॅरलेटला भेट दिले. तिने हे 1,20,000 पाऊण्डस्‌चे दागिने तिच्या कानात घातले. 20 व्या शतकापर्यंत, भारतीय राजांनी भारतीय हिरे-मोत्यांसह कार्टियर, व्हॅन क्लीफ आणि आर्पेल्स, हॅरी विन्स्टन यांसारख्या युरोपीय ज्वेलर्सवर छाप पाडण्यास सुरुवात केली.
 
या राजेशाही घराण्यांमधून गेल्या अनेक शतकांत मोठी संपत्ती तयार करण्यात आली, ती कालौघात नष्टही झाली. 1911 साली पटियाला येथील भूिंपदर िंसग यांच्यासाठी कार्टियरने तयार केलेला पटियाला हार खूप गाजला. यात 2930 हिरे, 234 कॅरेटस्‌च्या डे बिअर्स हिर्‍यांसह जडवण्यात आले होते. परंतु, हा हार 1928 नंतर गायब झाला, त्यामागचे कारण अद्याप समजलेले नाही. या हाराचा एक तुकडा कार्टियरला सापडला आणि त्यानंतर, नकली खड्यांसह या हाराचे मूळ रूप पुन्हा जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
 
तसेच, कापुरतळा येथील शत्रुजित टिक्का िंसग यांनी एक मोठ्या हिर्‍याचे बकल घातलेल्या आपल्या आजोबांचे छायाचित्र पाहिल्याचे राजेशाही इतिहासात म्हटले जाते. त्यांच्या म्हणण्यानुसार, 1730 साली नादिर शहा दिल्ली काबीज करीत होता आणि आम्ही त्याला काबीज करायच्या प्रयत्नात होतो, तेव्हा महाजाल हा जगातल्या सर्वोत्कृष्ट 10 हिर्‍यांपैकी असलेला कुशन कट 139.38 कॅरेटस्‌चा पिवळा हिरा आम्हाला सापडला. फाळणीच्या वेळी तो नाहीसा झाला. त्यानंतर आम्ही तो कधीही पाहिला नाही. बदलत्या रुचीला साजेसा होण्यासाठी तो लहान-लहान तुकड्यांमध्ये कापला होता.
 
प्रत्येक राजघराण्याला हिर्‍याची काहीतरी कथा जोडलेली आहेच. रामपूरचे नवाब काझिम अली खान यांना त्यांच्या मुकुटातले अद्वितीय हिरे आठवतात आणि तरीही आमचे घराणे बसरा मोत्यांचे चाहते होते, आमच्याकडे हे मोती मुबलक प्रमाणात होते, असेही ते सांगतात.
अनेक भारतीयांना आजही हिरे विकत घेणे आणि त्यांचा वापर करणे स्वप्नवत वाटते. राजेशाही इतिहासातल्या रोमँटिक कथांशी हिर्‍यांचा संबंध असल्यामुळे असेल, पण हिर्‍यांबद्दल आजही आपल्याकडे वेगळे कुतूहल दिसून येते. या खड्याची स्वतःची खास श्रीमंतीच याला कारणीभूत ठरते.
 
मी स्वतः मद्रासला एका लग्नाला गेले होते, तेव्हा तिथला हिरेजडित थाट पाहून मलाही हिर्‍यांबद्दल कुतूहल वाटायला लागले. एक रीत म्हणून, भावी वधूच्या दागिन्यांमध्ये मौल्यवान हिर्‍यांना विशेष स्थान मिळावे, यासाठी माझ्या आजीने हिरे व्यापार्‍याला पाचारण केले होते.
पांढराशुभ्र कुर्ता आणि धोतर घातलेला तो व्यापारी आमच्या घरी आला आणि त्याच्या खिशातून त्याने पांढर्‍या आणि आकाशी रंगाच्या मलमली कपड्यातून कुप्या बाहेर काढल्या. मला त्यात काय आहे, हे पाहण्याची पराकोटीची उत्सुकता होती. त्याने प्रत्येक कुपी उघडायला सुरुवात केली आणि त्यातले ते लखाखणारे हिरे पाहून मी स्तब्ध झाले. त्यातल्या प्रत्येक हिर्‍याला तो जसा आहे तसा बनण्यासाठी अनेक शतकांपासून उष्णता आणि दाब याच्या संकटातून कसे जावे लागले, हे ऐकल्यावर तर मला फारच आश्चर्य वाटले. तेव्हापासूनच, खूप त्रास सहन केल्यावरच काहीतरी शुद्ध, वेगळे निर्माण होते, यावर माझा विश्वास बसायला लागला.
 
मला आठवतंय्‌, जेव्हा माझे स्वतःचे दागिने निवडण्याची वेळ आली, तेव्हा माझ्या हिर्‍याच्या कानातल्यांमध्ये घोड्याच्या टापांचा आकार होता. ते नव्या खड्यापासून तयार केलेले नव्हते. वास्तविक, माझ्या आईने शुद्ध निळ्या हिर्‍याच्या अर्ध्या किमतीत तिच्या सोन्याच्या कंबरपट्‌ट्याला हिर्‍याचे कोंदण करून घेतले होते. मी तिच्यासोबत ज्वेलर्सकडे गेले होते आणि त्या कंबरपट्‌ट्यातल्या हिर्‍यापासून माझे कानातले बनताना बघून मला धक्काच बसला.
नव्या अवतारात हे हिरे नव्याने चमकू लागले. मी गळ्यात घातलेल्या पेण्डण्टसोबत ते इतके साजेसे झाले की, मला मी राणी असल्याचा भास होऊ लागला!
 
अनेक वर्षांनंतर, मी माझ्या नातीला माझे ते कानातले तिच्या पहिल्या वाढदिवसाला भेट म्हणून दिले, तेव्हा त्या हिर्‍यांप्रमाणेच तिच्याही डोळ्यांत मला चमक दिसली. हिर्‍यांचा तो प्रकाश वेचण्यासाठी तिने आपले चिमुकले हात उंचावले.
हिर्‍याच्या परंपरेचेच हे द्योतक होते. त्याच्या शुद्ध, स्वच्छ प्रकाशात पूर्वीच्या अनेक पिढ्या न्हाऊन निघाल्या आणि भावी कित्येक पिढ्यांनाही या प्रकाशाचा आस्वाद घेता येणार आहे. म्हणजेच, हे हिरे कायमच माणसाचे आयुष्य प्रकाशमय करीत राहणार आहेत...
-सत्या सरन
............