रणवीरसिंह गल्ली बॉय
   दिनांक :17-Feb-2019
मुंबई, 
लग्ना नंतर रणवीरसिंह जोरात आहे. त्याचा सिम्बा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आते त्याचा गलीबोय धुमाकूळ घालतोय. रणवीर सिंहेचे चाहते जगभर आहेत. त्याच्या नव्या हिप-हॉप अवतारासाठी त्याच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता हॉलिवूडचा सुपरस्टार विल स्मिथनेदेखील 'गली बॉय'चे कौतुक केले आहे.

 
 
रणवीर आणि आलियाची मुख्य भूमिका असलेला 'गली बॉय' विल स्मिथने पाहिला. त्याला चित्रपट इतका आवडला की लगेच त्याने चित्रपटाचे, रणवीरच्या दमदार परफॉरमन्सचे कौतुक करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. 'रणवीर, मला तुझी 'गली बॉय'चित्रपटातील भूमिका प्रचंड आवडली आहे. चित्रपटातील हिप-हॉप पाहून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. शाळेच्या दिवसांतील हिप-हॉपच्या आठवणींना तुझ्या चित्रपटाने उजाळा दिला.' रणवीरच्या अनेक फॅन्सनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला.