शहीद नितीन राठोड यांचे व्हिडीओ ठरले शेवटचे
   दिनांक :17-Feb-2019
-सोशल मीडियावर व्हायरल
 

 
संग्रामपुर ता.प्र.
जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाण्याच्या २ जवानांना वीरमरण आले आहे. त्यापैकी नितीन शिवाजी राठोड यांचे टिकटॉक या ॲपवर बनवलेले दोन व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. देशभक्तीवर बनवलेले हे दोन व्हिडीओ त्यांचे शेवटचे ठरले आहेत.
 
 
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील २ जवान शहीद झाले आहेत. त्यातच एका गरीब घराण्यातून जिद्दीच्या बळावर सैनिक बनणाऱ्या नितीन यांनी गावातील शाळेमध्ये पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. त्या शाळेच्या पटांगणातच हुतात्मा नितीन राठोड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
 
 
राठोड काश्मिरातील नैसर्गिक सौंदर्याचे अनेक फोटो काढून आपल्या कुटुंबियांना पाठवित असत. त्यांचे टिकटॉक या ॲपवर बनवलेले दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देशभक्तीवर बनवलेले हे दोन व्हिडीओ त्यांचे शेवटचे ठरले आहेत.