ग्राहकांचे हजारो कोटी रुपये धोक्यात; युपीआय अॅप डाऊनलोड न करण्याचे रिझर्व्ह बँकेचे आवाहन
   दिनांक :17-Feb-2019
मुंबई, 
 
भारतीय रिझर्व्ह बँकेने नव्या प्रकारच्या आर्थिक फसवणुकीचा इशारा बँकांना दिला आहे. युपीआय अॅपद्वारे ग‘ाहकांच्या खात्यातील हजारो कोटी रुपयांना हॅकर्स चुना लावू शकतात. त्यामुळे हा अॅप डाऊनलोड करू नका, असा अलर्ट रिझर्व्ह बँकेतर्फे जारी करण्यात आला आहे.
 
 
 
 
आर्थिक घोटाळेबाज ग‘ाहकांना एनी डेस्क अॅप पाठवतात आणि डाऊनलोड करायला सांगतात. त्यानंतर हॅकर्स मोबाईलवर आलेल्या नऊ डिजिटच्या कोडद्वारे पीडिताचा फोन रिमोटवर घेतात. या अॅप कोडला मोबाईलमध्ये टाकताच, हॅकर्सकडून ग‘ाहकांना काही परवानग्या मागितल्या जातात. अशाप्रकारे ग‘ाहकांच्या मोबाईल फोनची माहिती मिळवून त्यांच्या अकाऊंटमधून रक्कम काढली जाते. युपीआय िंकवा वॉलेटसार‘या पेमेंटशी संबंधित कोणत्याही मोबाईल बँिंकग अॅपद्वारेही आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय बँकेने सर्व कमर्शिअल बँकांना दक्षतेचा इशारा जारी केला आहे. बँकेत खाते असलेल्या अनेक ग‘ाहकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्यानेच बँकांनी हा इशारा दिल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.