प्रियांकाचे आगमन ना अद्भुत ना चकित करणारे
   दिनांक :17-Feb-2019
भारत जगातील सर्वात तरुण देश आणि सर्वात मोठी लोकशाही आहे. या दोन स्थापित तथ्यांसोबत एक बाब आणखी जोडून घ्या- या विशाल लोकशाहीतील सर्वात जुना राजकीय पक्ष, पुन्हा तरुण होण्यासाठी आतुर आहे.
कॉंग्रेसमध्ये राहुलसाठी मार्ग प्रशस्त करीत सोनिया गांधी यांचे अध्यक्षपदावरून खाली उतरणे, या तथ्याचा कथित संकेत होता आणि प्रियांका वढेरा यांच्या प्रवेशाने तर याची दवंडीच पिटली गेली.
 
तरुणांना समोर आणलेच पाहिजे आणि अशा प्रकारच्या निरामय प्रयत्नांचे स्वागतही झाले पाहिजे. परंतु, हे प्रकरण जरा वेगळे आहे. राहुल िंकवा प्रियांका यांचे वजन वाढविण्याची कॉंग्रेसवाल्यांची आकांक्षा, परिवाराला पूजणार्‍या पक्षाची परंपरा तर आहेच, परंतु लोकशाहीच्या दृष्टीने याला निरामय म्हणतायेणार नाही.
जिथे परिवारच केंद्र आहे आणि परिवाराचे हितच जिथे परीघ आहे, तिथे राष्ट्रीय िंचतेला अवसरच कुठे असतो?
कॉंग्रेसला कुठल्याही दोषांच्या पलीकडे मानणार्‍यांची संख्या आता फार काही उरली नाही. परंतु, भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा राजकीय पक्ष म्हणून याचे विश्लेषण करणारे निश्चितच मानतील की, एका आडनावाच्या खुंट्याला बांधून राहिल्याने पक्षात दुहेरी दोष निर्माण झाले आहेत.

 
 
पहिला- वरून स्थिती कशीही दिसली तरी, प्रत्यक्षात तिथे तरुणांना काही संधी नाही. वस्तुस्थिती ही आहे की, एकाच परिवारात राजकीय वारस शोधणारा हा पक्ष, भावी पिढीला (भलेही ज्याचे वय पन्नाशीला स्पर्श करत असेल) पुढे तर आणत आहे, परंतु हे करताना, नेतृत्वक्षमतेत या वारसदारांच्या तुलनेत अधिक प्रतिभाशाली असलेल्या िंकवा कुणाच्या तरी कृपादृष्टीसाठी वर्षानुवर्षे वाट बघण्यास तयार नसणार्‍या तरुणांचा मोहभंगही करत आहे.
दुसरा दोष हा की- परिवाराच्या भ्रष्टाचारामुळे कॉंग्रेस पक्ष जनतेचा विश्वास गमविणारा पक्ष झालेला आहे. पक्षाची संपूर्ण यंत्रणा, एका परिवाराच्या दु:खाला िंकवा आशा-आकांक्षांना पूर्ण करण्यातच एक प्रकारे घाण्याचा बैल बनून राहिल्याने, या पक्षाला सत्तेची किल्ली सोपविणार्‍या जनतेच्या देखील काही इच्छा असू शकतात, याचे भानच राहिले नाही. उदाहरणार्थ, कॉंग्रेसशासित राज्यांच्या काही माजी मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप आहेत की, त्यांनी परिवाराशी संबंधित कंपन्यांना जमीन आवंटित करण्याच्या धडपडीत कायदे-कानून आढ्यावर ठेवले.
 
अशा परिस्थितीत प्रियांका वढेरा यांच्या आगमनाकडे कसे बघायला हवे? चकित करणारा डाव की अद्भुत राजकीय क्षमता?
नक्कीच नाही.
पक्षाचे पिठ्‌ठू आणि प्रवक्ता याला विरोधकांना चकित करणारे पाऊल म्हणत आहेत. परंतु, यात विरोधकांनी िंकवा जनतेने चकित व्हावे, असे काय आहे? उलट, परिवाराच्या बाहेरच्या कुणाचे तरी नाव येते आणि त्याला या ‘वारसदारां’च्या तुलनेत समोरचे स्थान मिळते, तर मग त्याला आश्चर्य म्हणता आले असते. परंतु, इथे तर उलटेच आहे. राजकारणाच्या संदर्भात हे तर, अशा दुकानदारासारखे आहे की, जो वाटेल तितके नोकर ठेवतो पण गल्ल्यावर मात्र आपल्या मुलालाच बसवतो.
क्षमतेबाबत म्हणाल तर, कॉंग्रेसच्या संपूर्ण यंत्रणेत ‘परिवारा’ची क्षमता मापण्याची ना कुठली कसोटी आहे ना कुणाच्यात ती िंहमत! म्हणून ज्या प्रियांकासाठी कपिल सिब्बलसारख्या नेत्याने आधी दोन जागांवरून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले, त्या प्रियांकाने निवडणुकीला उभे राहण्यासच नकार देऊन टाकला. या सोबतच राहुल यांचे जे बयाण आले, त्याचा अर्थ असा होता की, त्यांच्या बहिणीची क्षमता 2019 च्या निवडणुकीवरून नाही तर, नंतर येणार्‍या विधानसभा निवडणुकांनंतर उजळून निघेल.
 
असो. परिवाराशी बांधील कॉंग्रेस पक्ष, प्रियांका-राहुल यांच्या रोड शोनंतर सिंचत आहे. कारण, पंजाबहून खास आणण्यात आलेली कॅप्टन अमरिंदर िंसह यांची ‘भाग्यशाली’ बस देखील लखनौतील लोकांमध्ये भावा-बहिणीसाठी आकर्षण निर्माण करू शकली नाही. हे तर पक्षाच्या मीडिया व्यवस्थापनाचे उपकार समजले पाहिजे की, ‘हात हलविणार्‍या सुंदर चेहर्‍यां’ना सोडून कुणाचा कॅमेरा सडकेवर उपस्थित जनतेची खरी ‘गर्दी’ दाखविण्यासाठी फिरला नाही.
जनता कुणाच्या खुंट्याला बांधलेली नाही; गर्दीवर कुणाचेही चालत नाही. वृद्ध कॉंग्रेसच्या परिवाराच्या इच्छा-आकांक्षांचेही कुणाला सोयरसुतक नाही. हे आपल्या दु:खांपुढे लाचार असलेल्या एखाद्या म्हातार्‍याच्या कथेसारखे आहे. गर्दी निघून गेली आहे आणि कथा पुढे सुरूच राहणार आहे.
... ... ...