शहीदांच्या कुटुंबीयांसाठी दहा मिनिटांत जमवले 17 लाख
   दिनांक :17-Feb-2019
मुंबई,
 
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. त्यामुळे संपूर्ण देशात शोक पसरला असून संपूर्ण देश शहीदांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे एकवटला आहे. शहीदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झालेला असतानाच मुंबईत रोजंदारी कर्मचारी आणि असंघटित कामगारांनी अवघ्या दहा मिनिटात 17.5 लाख रुपये जमा केले असून शहीदांच्या कुटुंबीयांना ही संपूर्ण रक्कम देण्यात येणार आहे.
 

 
 
 
ग‘ॅण्ट रोडच्या द स्कूटर पार्टस्‌ असोसिएशनने शनिवारी शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी श्रद्धांजली सभेच्या आयोजकांनी महाराष्ट्रातील दोन्ही शहीदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या आवाहनानंतर लोकांनीही तात्काळ खिशात हात घातले आणि शहीदांच्या कुटुंबीयांसाठी यथाशक्ती मदत केली. एका भेलपुरी विक‘ेत्यानेही त्याची दिवसभराची कमाई 1,100 रुपये दान केली. याशिवाय तीन हमालांनीही त्यांची एक दिवसाची कमाई दान केली, त्यामुळे दहा मिनिटांत 17.5 लाख रुपये जमा करण्यात यश आल्याचे आयोजकांनी सांगितलं.