मांजराची मुलायम पावले...
   दिनांक :17-Feb-2019
- मंथन / भाऊ तोरसेकर 
असे म्हणतात की, मांजराला कितीही उंचावरून फेकले वा ते आपोआप पडले, तरी आपल्या चार पायांवर सहज उभे राहते. त्याला जखमा-इजा होत नाही. कारण, त्याची पावले कमालीची मुलायम असतात. बहुधा तीच गुणवत्ता उपजत असल्याने, यादव घराण्यात पाऊणशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या नेत्याच्या जन्मदात्यांनी त्याचे नाव मुलायम ठेवलेले असावे. कारण गेल्या अर्धशतकात सामान्य कार्यकर्त्यापासून देशातल्या सर्वात मोठ्या राज्याचा प्रभावशाली नेता होताना मुलायमिंसह यादव यांनी नेहमी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या पायांवर उभे राहून दाखवलेले आहे. जनता दलाची सत्ता असताना अयोध्येत कारसेवकांवर गोळ्या झाडण्यातून रोषाला पात्र झालेले मुलायमिंसह यांनी, त्यांच्या कट्‌टर विरोधक कल्याणिंसह यांच्याशी राजकीय संगत करून दाखवलेली आहे आणि चतुराईने त्याच कल्याणिंसह यांच्यावर मात करण्यासाठी कांशीराम यांना हाताशी धरून भाजपाची सत्ता संपवलेलीसुद्धा आहे. तेच मुलायमिंसह नंतर मायावतींचे कट्‌टर विरोधक म्हणून उभे ठाकले आणि आपल्या मुलाने त्याच त्या मायावतींशी हातमिळवणी केली असतानाही तटस्थपणे बघत राहिलेलेही आहेत. अशा मुलायमिंसहांनी लोकसभेच्या अखेरच्या बैठकीत निरोपाचे भाषण करताना, नरेंद्र मोदींचे गुणगान करावे आणि पुन्हा त्यांचीच बहुमताने सत्ता येण्याच्या शुभेच्छा द्याव्यात, याला हसण्यावारी नेता येत नाही. वय झाल्याने मुलायम बरळले, असे काहींना वाटले तर नवल नाही. पण, डूख ठेवून डावपेच खेळण्यात त्यांच्यासारखा धूर्त राजकारणी अलीकडल्या उत्तरप्रदेशात कुणी झालेला नाही, हेही तितकेच सत्य आहे! असे मुलायमिंसह अकस्मात वा बोलण्याच्या ओघात मोदींना शुभेच्छा देऊन गेले, असा समज म्हणूनच गैरलागू आहे. ती त्यांनी केलेली एक खेळी असू शकते. म्हणूनच त्यात या नेत्याची मुलायम पावले कुठल्या दिशेने पडत आहेत, त्याचा शोध घेण्याला महत्त्व आहे.
 
 
 
 
 
2012 सालात त्यांच्याच पक्षाने उत्तरप्रदेश विधानसभा िंजकलेली होती आणि अतिशय चतुराईने त्यांनी आपल्या लाडक्या पुत्राच्या हाती सत्तासूत्रे सोपवून महत्त्वाकांक्षी सख्ख्या भावाला खड्यासारखे बाजूला केले. ते करताना आपल्याकडे कमीपणा घेण्यालाही त्यांनी मागेपुढे बघितले नाही. 2012 सालात बंगालच्या ममता बॅनर्जी यांचे कॉंगे्रसशी फिसकटले होते आणि त्यांनी सोनियांना आव्हान देण्यापर्यंत मजल मारलेली होती. त्यासाठी ममता, मुलायमच्या घरी पोहोचल्या आणि आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी परस्पर राष्ट्रपतिपदाचा उमेदवार घोषित करून टाकलेला होता. तेवढ्यापुरते पत्रकारांच्या समोर मुलायम यांनीही ममताला दुजोरा दिला आणि पाठ वळली तर विषय संपवून टाकला होता. 2008 मध्ये हेच मुलायमिंसह डाव्यांना मोठा आधार वाटलेले होते. अणुकराराच्या निमित्ताने डाव्यांना मनमोहन सरकार पाडण्यासाठी घाई झालेली होती आणि त्यांच्या रणनीतीमध्ये मुलायमचा पािंठबा गृहीत होता. मात्र, प्रत्यक्ष लोकसभेत बहुमत दाखवायची वेळ आली, तेव्हा मुलायम बाजू बदलून कॉंग्रेसच्या पािंठब्याला उभे राहिलेले होते. नंतरही परकीय गुंतवणुकीचा विषय आल्यावर त्यांनी टीकेची झोड उठवून सभात्यागातून व राज्यसभेत प्रत्यक्ष मतदानातून त्याच प्रस्तावाचे समर्थनही केलेले होते. आपल्या विविध चेहर्‍यांपैकी मुलायम कुठला मुखवटा लावून कधी बोलत असतात, ते त्यांच्या निकटवर्तीयांनाही समजणार नाही, अशी कायम स्थिती राहिलेली आहे. कधीकाळी अमरिंसह यांच्यामुळे आझम खान मुलायमपासून दुरावले होते आणि नंतर त्याच आझम खानसाठी अमरिंसह बाजूला पडलेले होते. त्यामुळे मुलायमच्या कुठल्या शब्दावर विश्वास ठेवावा आणि कधी त्यात फार काही अर्थ शोधू नये, याचा अंदाज लागू शकत नाही. आपल्याकडे शरद पवार आणि उत्तरप्रदेशात मुलायम सारखेच आहेत. म्हणूनच त्यांनी मोदीच पुन्हा पंतप्रधान संबोधण्यातला अर्थ गहन असू शकतो.
 
 
 
 
 
मागील विधानसभा निवडणुकीत पुत्राने सत्ता टिकवण्यासाठी कॉंग्रेस व राहुलशी युती केलेली मुलायमना आवडली नव्हती, त्याचेही कारण आहे. मुळातच कॉंग्रेसच्या पायाचे दगड घेऊन आपल्या पक्षाचा पाया घातलेल्या मुलायमना त्यातला धोका उमजला होता. पण, पुत्रानेच पित्याचे ऐकले नाही आणि आता पुन्हा कॉंग्रेसशी आघाडी नको म्हणून कानाला खडा लावलेला आहे. मायावती वा मुलायम यांचे प्रादेशिक पक्ष उत्तरप्रदेशात कॉंग्रेसचाच मतांचा गठ्‌ठा बळकावून बसलेले आहेत. त्यांनी त्याच पक्षाशी युती करणे म्हणजे आपला पायाच कॉंग्रेसला आंदण देण्यासारखे आहे, हे मुलायम छानपैकी जाणून आहेत. म्हणूनच कॉंग्रेसचे पुरोगामित्व त्यांना निवडणुकीतली भागी म्हणून नको असते. निकाल लागल्यावरची आघाडी त्यांना मान्य असते. कारण भाजपा हा समोरचा शत्रू आहे आणि कॉंग्रेस अस्तनीतला निखारा आहे, याची त्या अनुभवी नेत्याला जाण आहे. िंकबहुना त्यासाठीच त्यांनी अत्यंत नेमक्या मुहूर्तावर आपले हे आशीर्वाद मोदींना दिलेले आहेत. भाजपाने शत्रू म्हणून समाजवादी पक्षाचे जितके नुकसान केलेले नाही, त्यापेक्षा कॉंग्रेसने आपल्याला अधिक त्रास दिलेला आहे, असे त्यांनी याहीपूर्वी अनेकदा बोलून दाखवलेले आहे. साहजिकच त्यांना आपल्या प्रभावक्षेत्रात कॉंग्रेस बलशाली होण्यापेक्षा भाजपा अधिक ताकदीने निवडून आल्यास हवी आहे. लोकसभेच्या अखेरच्या बैठकीपूर्वी उत्तरप्रदेशात कॉंग्रेसने प्रियांका गांधींचा नवा पत्ता फेकलेला आहे आणि तो भाजपापेक्षाही आपल्याला त्रासदायक ठरू शकतो, हे ओळखूनच मुलायमिंसह यांनी अखेरच्या भाषणात कॉंग्रेसला अपशकुन केला आहे. ते आशीर्वाद खोटे नसून वास्तविक आहेत. त्यातून मुलायमना आपल्यासारख्या विविध विरोधी पक्षांना सुचवायचे आहे, की आपली रणनीती भाजपाच्या विरोधातली असतानाही कॉंग्रेसला पूरक असता कामा नये. तो अशा छोट्या पक्षांसाठी आत्मघात असेल, असा त्यातला खरा इशारा आहे.
 
 
 
 
 
 
एक गोष्ट निश्चित आहे, आज मुलायम जुन्या आवेशात नसतात. ते थकलेले आहेत आणि पक्षावरही त्यांची हुकुमत पूर्वीसारखी राहिलेली नाही. पण, पुत्राला आजसुद्धा पित्याच्याच नावाने मते मागावी लागत असतात. तो आपला सुपुत्र कुठले डावपेच खेळतो आहे, त्याला आपण िंकमत देत नाही. आपल्या पाठीराख्या मतदाराने निवड करताना कॉंग्रेसला झुकते माप जाणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यापेक्षा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झालेले चालतील, असाच इशारा त्यांनी दिलेला आहे. समाजवादी मतदार िंकवा त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्याला तो इशारा नेमका समजतो. त्याच्यासाठीच मुलायमनी हे शब्द उच्चारलेले आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नम्रतापूर्वक अभिवादन केले, यातला गर्भित अर्थ स्पष्ट आहे. ही त्या दोघांची मिलीभगतही असू शकते. कारण, मुलायम यांचा संघविरोध वा भाजपाविरोध अलीकडला असला, तरी हयात कॉंग्रेसविरोधात गेलेली आहे. ते डॉ. लोहियांचे शिष्य आहेत आणि लोहिया म्हणायचे, मोठ्या राक्षसाला संपवण्यासाठी छोट्या राक्षसाला सोबत घ्यावे. तशी भाजपाची मदत मुलायमनी यापूर्वी अनेकदा घेतलेली आहे. पण, भाजपाने मुलायम वा अन्य विरोधकांना संपवण्याचे घातपाती डावपेच कधी खेळले नाहीत. कॉंग्रेसने ते डावपेच कायम खेळलेले आहेत. अणुकराराच्या वेळी पािंठब्याच्या बदल्यात मनमोहन यांनी मंत्रिमंडळात स्थान देण्याचे मान्य केले होते. पण, सोनियांनी त्यांना शब्द पाळू दिला नाही, त्याचा डूख मनात ठेवलेला हा नेता, उगाच मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्याच्या शुभेच्छा देत नसतो. त्यात पडद्यामागचे अनेक डावपेच असू शकतात आणि अशा खेळी मोदीही मोठ्या धूर्तपणे पवारांशीही खेळलेले आहेत. उगाच पवारांनी विधानसभेपूर्वी महाराष्ट्रात आघाडी मोडली होती? मांजराची मुलायम पावले ज्यांना ओळखता येतील, त्यांनाच सोनियांच्या शेजारी बसून मुलायमनी मोदींना दिलेल्या शुभेच्छातला संदेश उमजू शकतो!