सुपरस्टार रजनीकांतची लोकसभा निवडणुकीतून माघार
   दिनांक :17-Feb-2019
चेन्नई,

 
 
 
आगामी लोकसभा निवडणुकीतून सुपरस्टार रजनीकांत यांनी माघार घेतली आहे. रजनीकांत यांच्यासह त्यांचा पक्ष रजनी मक्कल मंदारम्‌ही निवडणुकीत सहभागी होणार नाही. अभिनेते रजनीकांत यांनी प्रसिद्धीपत्रक काढूनच तशी घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीत माझा िंकवा माझ्या पक्षाचा कोणालाही पािंठबा राहणार नाही. चाहते आणि कार्यकर्त्यांनी आपल्या राजकीय पक्षाचे चिन्ह, झेंडा, फलक अशा कोणत्याही वस्तूचा वापर हा इतर पक्षाच्या प्रचारासाठी न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. लोकसभाऐवजी तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकांवर आमचे लक्ष असेल, असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे. रजनीकांत यांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते मात्र नाराज झाले आहेत.
 
 
अभिनेते रजनीकांत यांनी 31 डिसेंबर 2017 रोजी पक्षाच्या नावाची घोषणा करत, राजकारणात प्रवेश केला होता. रजनी मक्कल मंदारम्‌ असे नाव रजनीकांत यांनी आपल्या पक्षाचे नाव ठेवले होते.