साप्ताहिक राशीभविष्य ; 17 ते 23 फेब्रुवारी 2019
   दिनांक :17-Feb-2019
सप्ताह विशेष- सोमवार,18 फेब्रुवारी- भद्रा (प्रारंभ 25.09), मीनायन (28.34), पौर्णिमा प्रारंभ (25.09); मंगळवार, 19 फेब्रुवारी- माघस्नान समाप्ती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, भद्रा (समाप्त 11.16), सौर वसंत ऋतू प्रारंभ, रवी शततारका नक्षत्रात (23.15); बुधवार, 20 फेब्रुवारी- माघ कृष्ण पक्षारंभ, गुरुप्रतिपदा, श्री नृिंसह सरस्वती स्वामी शैल-गमन यात्रा- कारंजा, गाणगापूर, सौर फाल्गुन मासारंभ; गुरुवार, 21 फेब्रुवारी- भद्रा (प्रारंभ 24.23); शुक्रवार, 22 फेब्रुवारी- संकष्ट चतुर्थी (नागपूर चंद्रोदय- रात्री 9.12), भद्रा (समाप्त 10.47); शनिवार, 23 फेब्रुवारी- पंचमी क्षयतिथी (8.08 ते 30.11), श्री बिरबलनाथ यात्रा- मंगरूळनाथ (अकोला).
संक्षिप्त मुहूर्त- साखरपुडा- 19,21,22 फेब्रुवारी; बारसे- 19,21 फेब्रुवारी; जावळे- 18,22 फेब्रुवारी; गृहप्रवेश- 21 फेब्रुवारी.
साप्ताहिक राशीभविष्य
 
 
 
मेष- आर्थिक व्यवहारात सावध
या आठवड्यातील प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशिस्वामी मंगळ राशिस्थानात आहे. चंद्र पराक्रम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर सहाव्या कर्म स्थानात जाईल. एकंदर ग्रहयोग पाहता हा आठवडा आपणांस संमिश्र स्वरूपाचा जावा. साधारणतः मौज-मजा, करमणुकी, प्रवास-पर्यटन यावर खर्च वाढण्याची शक्यता आहे. काहींना कुसंगतीचा, व्यसनांचा व त्यातून प्रकृतीसंबंधी त्रास निर्माण होऊ शकतो. स्वभावातील हट्टीपणा जरा कमी करावयास हवा. तरुणांना प्रेमसंबंधातून मन:स्ताप संभवतो. कायदेशीर चौकट मोडू नये. आर्थिक व्यवहारात सावध राहा.
शुभ दिनांक- 18,20,22,23
वृषभ- झटपट निर्णयातून लाभ
या आठवड्यातही प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशिस्वामी शुक्र अष्टम या त्रासदायक स्थानात योगकारक शनीसोबत आहे. गुरू आपल्या राशीला पाहात आहे. चंद्र या आठवड्यात धन स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर तो पंचम स्थानात जाईल. या आठवड्यात आपला आर्थिक आलेख निश्चितपणे उंचावताना जाणवेल. व्यवसायात अर्थलाभ संभवतो. जुनी येणी मिळू शकतील. नोकरीत असलेल्यांना काही झटपट निर्णयातून लाभ संभवतो. वेळकाढूपणा टाळायला हवा. मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढेल. युवावर्गास नोकरी-व्यवसाय, विवाहादीचे शुभ योग यावेत. शुभ दिनांक- 18,19,20,22
मिथुन- अचानक मोठ्या संधी
या आठवड्यात प्रारंभीची ग्रहस्थिती बव्हंशी मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशिस्वामी बुध अष्टमस्थानात आहे. सप्तमातून शनीची राशीवर दृष्टी आहे. चंद्र आपल्याच राशीतून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर तो सुख स्थानात जाईल. या आठवड्यात काही उत्साहवर्धक योग आपल्या वाट्यास अचानकपणे येऊ शकतील. काहींना नोकरी-व्यवसायात उत्कर्ष, अचानक मोठ्या संधी मिळू शकतात, धनलाभ देखील संभवतो. साहित्य, क्रीडा, कला क्षेत्रातील लोकांना सन्मान, प्रतिष्ठा लाभेल. कामाचे कौतुक होईल. युवकांना शिक्षण, नोकरी या अनुषंगाने लाभदायक योग यावेत.
शुभ दिनांक- 17,18,20,21
कर्क- नोकरी-व्यवसायात प्रगती
आपला राशिस्वामी चंद्र व्यय स्थानातून या आठवड्याचे भ्रमण सुरू करीत असून तो आठवडाअखेर पराक्रम स्थानात येईल. याशिवाय आपल्या राशीत राहू मुक्कामाला आहे. आपल्या राशीवर गुरूची शुभ दृष्टी आहे. हा आठवडा आपणास उत्तम जावा. राशिस्वामी चंद्र अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात बढती, वाढ, प्रगती देणारा हा काळ आहे. काहींना पदोन्नतीसंबंधी हालचाली होताना दिसू शकतात. कौटुंबिक स्तरावरही आनंदाची स्थिती आहे. मुळातच समाधान आणि आत्मविश्वासाची आपल्यालो दैवी देणगी आहे. त्यामुळे स्पर्धा, कसोटी यातून यश मिळवाल. काहींना अस्वास्थ्य, आर्थिक पेच संभवतात.
शुभ दिनांक- 18,19,20,21
सिंह - कुटुंबात असमाधान, नाराजी
या आठवड्याच्या सुरुवातीला आपला राशिस्वामी रवी सप्तम स्थानी आहे. चंद्र लाभ स्थानातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर धन स्थानी येईल. हा आठवडा आपणास विशेषतः व्यवसायात अचानक लाभाचा व प्रगतीचा ठरू शकतो. सुरुवात जेमतेमच होणार असली, तरी मधला काल उत्तम ठरू शकतो. काही लोकांशी नव्याने झालेली ओळख महत्त्वाची ठरेल. कोर्टाची प्रकरणे, वारसाचे प्रकरण, यात आपणास फायदा व्हावा. कुटुंबात मात्र असमाधान, काहीसा संघर्ष, मतभिन्नता, नाराजी उत्पन्न होऊ शकते. कुणाला बोलून दुखवू नका. काहींना आरोग्याचा त्रास होऊ शकतो. किरकोळ नुकसान संभवते.
शुभ दिनांक- 20,21,22,23
कन्या- भाग्यवर्धक संधी लाभतीत
या आठवड्यातील ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. राशिस्वामी बुध पंचमस्थानात आहे, तर ापल्या राशीवर शनीची दृष्टी आहे. याशिवाय चंद्र दशम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो आपल्याच राशीत येईल. प्रिय व्यक्ती तसेच संततीला, मुलाबाळांना विशेष उपयुक्त असा हा आठवडा असणार आहे. शिक्षण क्षेत्र, साहित्य व कलाक्षेत्रातील व्यक्तींना देखील अतिशय उत्साह व प्रगतीचे वातावरण या सप्ताहात जाणवावे. तरुण वर्गाला भाग्यवर्धक संधी लाभतीत, नोकरी, शिक्षणासाठी विदेशात जाऊ इच्छिणार्‍यांसाठी अनुकूल घडामोडी घडू शकतात. काहींना मात्र अनारोग्याचे भय राहू शकते.
शुभ दिनांक- 18,19,22,23
तूळ- अपेक्षित परिणाम दिसतील
या आठवड्यात प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. राशिस्वामी शुक्र पराक्रम स्तानात योगकारक शनीसोबत आहे. चंद्र भाग्य स्थानातून भ्रमण सुरू करीत असून तो आठवडाअखेर व्यय स्थानात जाईल. बव्हंशी सुखकर अशा या आठवड्यात आपणास मोठ्या वस्तूंच्या खरेदीचे योग यावेत. आपली आवड-निवड जपणार्‍या वस्तूंची खरेदी संभवते. खर्च वाढेल पण तो वाया जाणार नाही. कला, छंद, साधना यातून आपण अपेक्षित परिणाम साधू शकाल. मित्रांसमवेत करमणूक व मनोरंजनाच्या सहलीच्या योजना ठरू शकतात. काहींना आग, वीज यांच्या अपघातापासून सावध राहण्याची गरज आहे.
शुभ दिनांक- 17,19,20,22
वृश्चिक- आर्थिक बळकटी लाभेल
या आठवड्यात ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. आपला राशिस्वामी मंगळ सहाव्या कर्म स्थानात आहे. तर गुरू आपल्या राशीत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र अष्टम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून तो आठवडाअखेर लाभ स्थानी येणार आहे. या आठवड्याची सुरुवात काहीशी मन:स्तापकारक होणार असली, तरी लवकरच जीवनातील काही महत्त्वाच्या पैलूंना दिशा देणारे योग अवश्य लाभू शकतात. त्यामुळे विशेषतः युवावर्गाला नोकरी, विवाह, विदेशवारी या दृष्टीने काही महत्त्वाच्या हालचाली घडत असल्याचे जाणवावे. जीवनमान उंचावेल. आर्थिक बळकटी लाभेल. व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबात समाधान राहील.
शुभ दिनांक- 19,20,21,22
धनू- आनंददायी अनुभव लाभणार
या आठवड्यातील ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. राशिस्वामी गुरू व्ययात असून शनी आपल्या राशिस्थानी आहे. चंद्र सप्तम स्थानातून भ्रमण सुरू करणार असून तो आठवडाअखेर दशम स्थानात येणार आहे. नवीन घरात प्रवेश, नोकरीत उत्कर्ष, व्यवसायात वाढ, नवीन फायदेकारक करार, नवीन वाहनाची खरेदी अशा एक ना अनेक आनंददायी घटनांनी युक्त हा आठवडा आपल्यापैकी अनेकांना अनुभवास येणार आहे. कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाची आखणी केली जाऊ शकते. आर्थिक स्थिती उत्तम राहावी. साडेसातीचे भान ठेवा. उगाच बढाया मारू नये व क्षमतेपेक्षा मोठ्या गोष्टींकडे धाव घेऊ नये.
शुभ दिनांक- 17,21,22,23
मकर- व्यावसायिक स्पर्धेत सरशी
या आठवड्यातील ग्रहस्थिती बव्हंशी मागील सप्ताहासारखीच आहे. राशिस्वामी शनी व्ययस्थानात असून राशिस्थानी बुध व केतू आहे. चंद्र सहाव्या स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर भाग्य स्थानी जाणार आहे. उत्तम ग्रहमानाच्या या आठवड्यात काही अभूतपूर्व संधींचा लाभ व्हावा. नोकरीत आपले महत्त्व वाढेल. व्यावसायिक स्पर्धेत सरशी होईल. सरकारी कामात यश मिळेल. कामे वेगाने पुढे सरकतील. जोडीदाराच्या तसेच मुलांच्या प्रगतीमुळे समाधान मिळेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. उत्सव-समारंभाचे आयोजन व्हावे. काहींना छुप्या शत्रूंपासून उपद्रव संभवतो, त्यामुळे सतर्कता आवश्यक.
शुभ दिनांक- 17,18,22,23
कुंभ- चांगल्या संधी लाभतील
या आठवड्यात प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. राशिस्वामी शनी शुक्रासोबत लाभस्थानात असून राशीत रवी आहे. चंद्र पंचम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो अष्टम स्थानात जाईल. हे ग्रहमान पाहता व्यावसायिक व आर्थिक घडी बसविण्यात यश मिळेल. आर्थिक बळकटी लाभेल. नोकरीसाठी प्रयत्नशील युवांना चांगल्या संधी लाभू शकतात. अचानक धनलाभ संभवतो. घरात चांगल्या बातम्या कानी पडतील. काहींना मात्र कार्यक्षेत्रातून मानसिक िंचता सतावण्याची शक्यता आहे. नकारात्मक विचार झटकून उमेदीने संधींचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न असावा.
शुभ दिनांक-17,19,20,21
मीन- व्यावसायिक यशाचे समाधान
या आठवड्याच्या सुरुवातीला प्रमुख ग्रहस्थिती मागील सप्ताहासारखीच आहे. राशिस्वामी गुरू भाग्य स्थानात आहे. धनस्तानी स्वराशीचा मंगळ आहे. चंद्र आपल्या सुख स्थानातून भ्रमण सुरू करीत असून तो शेवटी सप्तम स्थानात जाणार आहे. नोकरीत तसेच व्यवसायात मोठ्या संधी देणारे ग्रहमान या आठवड्यात आपणास लाभले आहे. व्यावसायिक यशाचे हे योग आहेत. आपल्या जोडीदाराचाही उत्कर्ष होताना पाहून समाधान मिळेल. परदेश गमनाच्या संधी येऊ शकतात. काहींना मात्र किरकोळ अपघाताचे भय राहील. वीज, आगीची उपकरणे वापरताना सतर्क असावे, वाहने काळजीपूर्वक चालवावीत.
शुभ दिनांक- 18,19,20,21
।। इति शुभम्‌ ।।
- मिलिन्द माधव ठेंगडी (ज्योतिष शास्त्री)
भ्रमणसंवादी ः 8600105746
----------------