Rashi bhawiashya
   दिनांक :18-Feb-2019
मेष : कठीण परीक्षेला सामोरे जावे लागेल, मात्र त्यात तुम्ही यश मिळवाल. मारोतीची उपासना करा.
वृषभ : तुम्ही मनांत योजलेली योजना आज साकार होईल. विशेष श्रम घ्यावे लागतील. भुकेलेल्याला अन्न दान करा.
मिथुन : तुम्ही साहित्य, कला या प्रांतातले असाल तर आजचा दिवस तुमचा आहे. मानसन्मान मिळेल. तुळशीचे रोपटे लावा.
कर्क : आज कुठलीच घाई करू नका. बाहेर पडताना सावध असा. पिवळा रंग आज लाभदायी आहे.
सिह : नाचता येईना अंगण वाकडे, या म्हणीचा प्रत्यय घ्याल.कुणावर विसंबून राहू नका. इष्ट देवतेचे नामस्मरण करा.
कन्या : पैशाचे काम पैशानेच होते अन्‌ भावनेचे भावनेनेच. त्यामुळे आज कुणी मदत मागायला आला तर विचारपूर्वक निर्णय घ्या.
तूळ : आज सहलीला जाल, मौजमजा कराल. तुमची विशेष प्रशंसा होईल. सायंकाळनंतर देवाच्या दर्शनाला जा.
वृश्चिक : तुमच्या मनात एकट असते आणि घडते भलतेच, मात्र आज असे होणार नाही. सकाळी बाहेर पडताना गायीला घास घाला.
धनू : तुम्ही मनांत योजलेली योजना आज साकार होईल. विशेष श्रम घ्यावे लागतील.
मकर : तुमच्या कामात इतरांचा हस्तक्षेप होण्याची दाट शक्यता आहे. त्यांना त्याचवेळी उत्तर द्या. बेलवृक्षाखाली बसून िंचतन करा.
कुंभ : पैशाचा मोह होईल, स्वत:ला सांभाळा. मात्र आज धनलाभ आहे. त्यासाठी काही करण्याची गरज नाही. चांगल्या तुपाचा दिवसा देवाजवळ लावा.
मीन : आज धोका आहे. सावध असा; पण काळजीचा विषय नाही. कुणीतरी अचानक मदत करेल. महादेवाला दुधाचा अभिषेक करा.