भारतीय महिला संघाला विश्व मल्लखांबचे सांघिक विजेतेपद
   दिनांक :18-Feb-2019
मुंबई,
पहिल्या जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने २४४.७३ गुणांसह सांघिक विजेतेपद पटकावले, तर सिंगापूरने ४४.४५ गुणांसह दुसरे स्थान, तर मलेशियाने ३०.२२ गुणांसह तिसरे स्थान मिळविले.
 
 
 
विश्व मल्लखांब महासंघाच्या विद्यमाने व भारतीय मल्लखांब महासंघ तसेच महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना यांच्या वतीने सहकार्याने मुंबईत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत व यजमान भारतासह स्पेन, जर्मनी, झेक प्रजासत्ताक, अमेरिका, इराण, नॉर्वे, इंग्लंड, फ्रान्स, मलेशिया, सिंगापूर, जपान, व्हिएतनाम, बहरीन असे एकूण १५ देश सहभागी झाले होते.
 
विश्व स्पर्धेच्या सांगता समारंभात खेळाडूंनी पारंपरिक खेळाचे आकर्षक प्रात्याक्षिके सादर केलीत. इटलीच्या डेलिया सेरुटीने दोरी मल्लखांबावर, तर जपानच्या कोइको टाकेमोटोने पुरलेल्या मल्लखांबावर आपले संच सादर केले. पुरुष विभागातून दीपक शिंदे आणि सागर ओहळकर यांनीही आपले कौशल्य सादर केले.
 
नुकतेच जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेल्या उदय देशपांडे यांच्या जर्मनी मधील मल्लखांब खेळाडूंनी संगीताच्या चालीवर आपले मनोरे सादर केले. श्री समर्थ व्यायाम मंदिरात प्रशिक्षण घेणार्‍या दोन योगापटूंनी मनोवेधक योगासनाचे प्रात्यक्षिक सादर केले. या समारोप सोहळ्यात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराप्राप्त खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.