सानिया मिर्झाला ब्रँड अँबेसेडर पदावरून हटवा
   दिनांक :18-Feb-2019
नवी दिल्ली, 
टेनिसपटू सानिया मिर्झाला तेलंगणाच्या ब्रँड अँबेसेडर पदावर हटवा, अशी मागणी भाजपाचे आमदार राजा सिंह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे. सोबत त्यांनी सानिया मिर्झाचा पाकिस्तानची सून म्हणून उल्लेख केला.
 
 
 
पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पृष्ठभूमीवर तेलंगणा सरकारने सानिया मिर्झाचे ब्रँड अँबेसेडरपद काढून घ्यावे. सानियाऐवजी सायना नेहवाल अथवा पी.व्ही. सिंधूसारख्या खेळाडूंना ब्रँड अँबेसेडरपद देण्यात यावे, असे ते म्हणाले.
 
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी जुलै २०१४मध्ये सानिया मिर्झाला तेलंगणाच्या ब्रँड अँबेसेडरपदी नेमले होते.