शहिदांच्या कुटुंबीयांना अक्षय कुमारची ५ कोटीची मदत
   दिनांक :18-Feb-2019
पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अनेक  कलाकार पुढे आले आहेत. अभिनेता अक्षय कुमार शहिदांच्या कुटुंबीयांना ५ कोटी रुपयांची मदत करणार आहे.
 
 
 
 

 
बॉलिवूडच्या या खिलाडी कुमारने हल्ल्यानंतर 'भारत के वीर' या वेबसाइटच्या माध्यमातून शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर हजारो हात मदतीसाठी पुढे सरसावले असून गेल्या ३६ तासांत या वेबसाइटच्या माध्यमातून ७ कोटींचा निधी जमा झाला. या जमलेल्या रकमेत अक्षय स्वत: पाच कोटी रुपयांचे योगदान देणार आहे.
 
 
 
पुलवामा हल्ल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली. तर 'उरी' चित्रपटाच्या टीमने १ कोटी रुपये दिले.