गहलोत यांच्यावर मुंबईत शस्त्रक्रिया
   दिनांक :18-Feb-2019
मुंबई ;
 

 
 
 
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर रविवारी येथील एका रुग्णालयात हर्नियाची  करण्यात आली. हर्नियाचे वेळेवर निदान झाल्यावर माझ्यावर मुंबई येथे शस्त्रकि‘या करण्यात आली, असे ट्विट त्यांनी केले. रोगांप्रति जागरूक राहा, खासकरून पूर्णपणे दुरुस्त होणे शक्य असलेल्या स्वाईन फ्लूबाबत दक्ष राहून काळजी घ्या, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. स्वाईन फ्लूमुळे राजस्थानात 70 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.