गडचिरोलीत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
   दिनांक :19-Feb-2019
मूल,
येथिल वार्ड क्र. सात मधील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थिनीने घराजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. मृतकाचे नाव समिक्षा शरद भोयर, वय १६ वर्ष असे आहे. मृतक विद्यार्थिनी मूल येथिल स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेत दहावीत शिक्षण घेत होती .
  
घरातील सर्वांचे जेवण आटोपल्या नंतर समिक्षा ही अभ्यास करीत होती . सर्व मंडळी रात्री झोपल्या नंतर आत्महत्येची घटना घडली असावी. भोयर यांच्या मोठ्या मुलीला अचानक जाग आल्यानंतर, तिला समिक्षा जागेवर दिसली नाही, तसेच दरवाजाही उघडा होता. त्यामुळे समिक्षा कुठे गेली असावी याबाबत घरच्या मंडळींनी शोधाशोध घेतल्या नंतर विहिरीत तिचे शव दिसून आले.
 
याप्रकरणी, शरद भोयर यांनी फिर्याद नोंदविली असून या प्रकरणात एका युवकासह इतर दोन युवकांवर संशय व्यक्त केला अाहे . मोबाइल ताब्यात घेण्यात आले असल्याने प्रकरणाची गुढता वाढली आहे. प्रेमप्रकरणातून अात्महत्या झाली काय , याचा पुढील तपास मूल पोलिस करीत आहे .