शेतातील खुना गाडण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी
   दिनांक :19-Feb-2019
- ११ जणांवर गुन्हे दाखल
शिरपूर जैन,
ग्राम नावली येथे शेतातील आपल्या हद्दीतील धुर्‍यावर खुणा गाडण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली. परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरुन दोन्हीकडील ११ जणांविरुद्ध शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.
 
 
 
फिर्यादी रामकोर आश्रुजी बाजड रा. नावली यांनी शिरपूर पोस्टेला दिलेल्या फिर्यादीनुसार आपण मुलासोबत शेतात ओळख खुणा गाडत असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जागा ताब्यात घेण्याचे कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन थापड बुक्यांनी मारहाण केली, तसेच त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपी राजु महादजी बाजड, संदीप आश्रुजी बाजड, प्रदीप आश्रु बाजड, गजानन कोंडजी मोरे, ज्ञानेशवर राजु बाजड, महादजी संपत बाजड सर्व रा. नावली यांचेविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
 
दुसर्‍या गटाकडून राजाराम महादजी बाजड रा. नावली यांनी फिर्याद दिली की, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान फिर्यादी राजाराम हे घरासमोर उभे असताना आरोपींनी संगनमत करुन फिर्यादीस काठीने डाव्या हातावर मारुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन जिवाने मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरुन तसेच वैद्यकीय अहवलावरुन पोलिसांनी आरोपी नारायण आश्रुजी बाजड, साहेबराव आश्रुजी बाजड, प्रकाश उद्धवराव बाजड, गजानन प्रल्हाद बाजड, विलास प्रल्हाद बाजड सर्व रा. नावली यांचेविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास पो.कॉ. दामोदर इप्पर हे करीत आहेत.