शिवजयंतीच्या निमित्ताने ब्रह्मपुरीत विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम
   दिनांक :19-Feb-2019
ब्रम्हपुरी,
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाविद्यालयीन शाखेच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान आनंद नगर परिसरात राबविण्यात आले.
 
 
ब्रम्हपुरी शहरात बहुतांश विद्यार्थी बाहेरील जिल्ह्यातून शिक्षणासाठी येतात. त्यापैकी काही विद्यार्थी शासकीय ततंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत असून देलनवडी या परिसरात भाडेकरु म्हणून राहात असतात. त्यापैकीच काही विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील अस्वछता पाहून या शिवजयंतीला स्वच्छता अभियान राबवून व एक निश्चय केला की येणारे प्रत्येक साप्ताहिक रविवार परिसरातील वेगवेगळ्या स्थानांवर स्वच्छता मोहीम राबवतील व नगरसेवक मनोज वटे यांनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यास मोलाचे सहकार्य केले.

 
 
अश्याप्रकारे नागरिकांना मोलाचा संदेश देऊन विद्यार्थ्यांनी शिवजयंती साजरी केली. या उपक्रमात निखिल राऊत, चेतन राहुलगडे, जतिन दुधनकर, संजिव कुर्झेकर, गुलशन मोहरकर, तुषार रेवतकर, प्रज्वल लोनबले, धिरज निकुरे, अमर कोटगले, जुगल वैदय, आशिष सरोदे, रोहित जिभकाटे, रोहित बिलवणे, रामथन आरीकर, चंद्रशेखर घाटोळे, यश माटे, प्रविण पत्रिकार, संघर्ष अवसरे सहभागी होते.