शालेय साहित्य नेणाऱ्या ट्रॅक्टरवरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
   दिनांक :19-Feb-2019
- लाखनी तालुक्यातील किटाडी येथील घटना
 
परीक्षा केंद्रावर ट्रॅक्टरने डेस्क, बेंच सोडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी किटाडी येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. चेतन विनायक जवंजाळ (१५) रा.मिरेगाव असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे आज शाळेला सुट्टी असतानाही विद्यार्थ्याकडून शाळेत काम करून घेतले जात असल्याने सदर घटना घडल्याचा आरोप करीत घटनेनंतर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी मुख्याध्यापक, शाळा संचालक व ट्रॅक्टर चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीला घेऊन आंदोलन सुरु आहे.