भंडाऱ्यात जीर्ण अवस्थेत मृतदेह आढळला
   दिनांक :19-Feb-2019
-घातपाताची भीती
 
भंडारा,
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या पचारा जंगलात एका ४० वर्षीय इसमाचा मृतदेह जीर्ण झालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ज्या ठिकाणी मृतदेह होता, तिथे असलेल्या झाडाला टॉवेल लटकलेला असल्याने गळफास घेतल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
 
 
 
जवळपास दिड महिन्यांपूर्वीचा हा मृतदेह असावा व कुजल्याने खाली गळून पडल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तुमसरचे पोलीस निरीक्षक सिडाम यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. पोलीस स्टेशन अंतर्गत नोंद असलेल्या हरविलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलविण्यात आले, मात्र ओळख पटली नसून अधिक तपास सुरू आहे.