पाकिस्तानला झटका; कुलभुषण जाधव खटला स्थगित करण्याची मागणी फेटाळली
   दिनांक :19-Feb-2019
कुलभुषण जाधव प्रकरणाचा खटला स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे ) मंगळवारी फेटाळून लावली. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. आयसीजेमध्ये सध्या भारताचे नागरिक कुलभुषण जाधव यांच्या सुटकेबाबतच्या खटल्यावर सुनावणी सुरु आहे. यावर आज पाकिस्तानने आपली बाजू मांडली.
 
 
काल भारताने गुप्तचर असल्याच्या आरोपावरुन पाकिस्तानने अटक केलेले कुलभूषण जाधव यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी भारताने सोमवारी आयसीजेमध्ये केली होती. जाधव यांच्यावर पाकिस्तानातील लष्कारी न्यायालयात खोटा खटला चालवला गेला आणि त्यांना मृत्यूदंड देण्यात आला तो रद्द करावा, असा युक्तीवाद भारताच्यावतीने करण्यात आला होता.