भारत-स्पेनमध्ये दहशतवादावर चर्चा
   दिनांक :19-Feb-2019
माद्रिद, 

 
 
 
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज मंगळवारी स्पेनचे समपदस्थ जोसेफ बॉरेल यांच्यासोबत व्यापार, संरक्षण आणि दहशतवादावर चर्चा केली. परस्पर हितांच्या विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सूत्रांनी दिली. स्पेनच्या भेटीवर येथे दाखल झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी भारत सरकारच्या वतीने मानवंदना स्वीकारली. मागील पाच महिन्यांच्या काळात स्वराज यांनी स्पेनचा केलेला हा तिसरा दौरा होय.