न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात शिवजयंती साजरी
   दिनांक :19-Feb-2019
न्यूयॉर्क, 
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव महाराष्ट्र िंकवा भारतापुरता मर्यादित न राहता जगभर साजरा केला जातो. शिवजयंतीनिमित्त जगभरात विविध कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहेत.
 

 
 
 
आपल्या ‘जाणता राजा’ला अभिवादन करण्यासाठी न्यूयॉर्कमधील भारतीय वकिलातीत तेथील भारतीय जमले होते. या कार्यक्रमाला सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, डेप्युटी कौन्सिल जनरल शत्रुघ्न सिन्हा, सिनेटचे सदस्य केविन थॉमस यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. अमेरिकेतील शेकडो भारतीय या कार्यक्रमासाठी जमले  होते.
 
 
 
 
डेप्युटी कौन्सिल जनरल शत्रुघ्न सिन्हा यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
केविन यांनी उपस्थितांचे स्वागत करीत शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तसेच शिवाजी महाराजांबद्दलच्या आपल्या भावनाही व्यक्त केल्या. शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना केविन थॉमस यांनी व्यक्त केली.
 
 
 
 
बॉलिवूडचा अभिनेता रितेश देशमुखनेही व्हीडिओ मेसेजद्वारे शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे स्वत: या कार्यक्रमाला उपस्थित होते. नागराज मंजुळे यांनी शिवजयंतीनिमित्त उपस्थितांना संबोधित केले. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासातील हॉलमध्ये शेकडो शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.