नागराज मंजुळेंचा ' झुंड ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
   दिनांक :19-Feb-2019
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आणि नागराज मंजुळे याचे दिग्दर्शन ' झुंड ' या चित्रपटाद्वारे आपलायला पाहायला मिळणार आहे .या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
 

 
 
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी गेल्या वर्षीच या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. बारसे हे झोपडपट्ट्यांमधील मुलांना फूटबॉल शिकवतात. या चित्रपटात या शिक्षकाची भूमिका अमिताभ बच्चन साकारणार आहेत.
 
 
 
 
अमिताभ बच्चन यांनी तारखा उपलब्ध नसल्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. नंतर कॉपीराईटसंबंधित काही अडचणींचादेखील सामना 'झुंड'ला करावा लागला. दरम्यान, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात उभारलेला सेटही काढून टाकण्यात आले होते. अशा असंख्य अडचणींनंतर 'झुंड'चे चित्रीकरण नागपुरात यशस्वीरित्या पार पडले.