वर्धा जिल्ह्यातील ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
   दिनांक :19-Feb-2019
- ३ पोलिस निरीक्षकांची नागपूर ग्रामीणमध्ये बदली
वर्धा,
महाराष्ट्र पोलिस अधिनियम व पोलिस महासंचालकाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ३ ठाणेदार व ८ पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षांची प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हा पोलिस अधिक्षकांना मिळालेल्या आदेशाप्रमाणे आपला कार्यकाह पूर्ण करणारे तीन ठाणेदार चंद्रकांत मदने, देवळीचे ठाणेदार दिलीप ठाकुर, व सिंदी (रेल्वे) चे ठाणेदार विलास काळे यांची बदली नागपूर ग्रामीणला झाली आहे.
तर नागपूर ग्रामीणचे योगेश पारधी, रवींद्र गायकवाड व हेमंत चांदेवार यांची बदली वर्धा जिल्ह्यात झाली आहे. वर्धा जिल्ह्यात विशेष शाखेत कार्यरत पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत बागडींना एसडीपीओ कार्यालयात रिडर ब्रांच मध्ये पाठविण्यात आले आहे. नियंत्रण कक्षाचे पीएसआई मिलिंद रामटेकेंना आवेदन शाखेत पाठविण्यात आले आहे. शहर ठाण्यातील पीएसआई शुभांगी तकीदला अल्लीपूर ठाण्यात बदली करण्यात आली आहे. कारंजा ठाण्यातील पीएसआई धर्मराज पटलेंची बदली वर्धा ठाण्यात झाली आहे. तळेगांव ठाण्यातील पीएसआई प्रदीपकुमार राठोड यांची देवळी येथे बदली झाली आहे. तर देवळीचे पीएसआई धीरज राजूरकर यांची तळेगांव येथे बदली झाली आहे. अल्लीपूर ठाण्याचे पीएसआई राजू चौधरी यांची एसडीपीओ पुलगांव रिडर ब्रांचमध्ये व हिंगणघाटचे पोलिस निरीक्षक महेंद्र सुर्यवंशी यांची बदली वर्धा पोलिस कल्याण शाखेत बदली झाली आहे.