१२ वर्षीय चिमुकलीचा पिस्तूलसोबत खेळताना मृत्यू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 

 
 
 
 
१२ वर्षाच्या मुलीचा वडिलांच्या पिस्तूलसोबत खेळताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लखनौ मध्ये ही घटना घडली असून मुलगी वडिलांच्या पिस्तूलसोबत खेळत होती आणि चुकून तिच्याकडून गोळी सुटली. उपचारासाठी तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
 
 
पोलिस निरीक्षक राज कुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ठाकुरगंज परिसरात ही घटना घडली. नरेंद्र सिंह गुरुवारी संध्याकाळी घरी आले असता कपडे बदलताना त्यांनी पिस्तूल डायनिंग टेबलवरच ठेवले होते. त्याचवेळी आयुषी सिंहने पिस्तूल उचलली आणि त्याच्यासोबत खेळू लागली. खेळताना मुलीने बंदूक आपल्या डोक्यावर ताणली आणि आत्महत्या करत असल्याचे  नाटक करु लागली. याचवेळी अपघाताने तिच्याकडून गोळी सुटली’.
 
 
कुटुंबाने तात्काळ किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ट्रॉमा सेंटरमध्ये धाव घेतली. पण तिचा जीव वाचू शकला नाही. पोलिसांनी पिस्तूल जप्त केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.