पंढरपूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
पंढरपूर-सोलापूर महामार्गावर कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये पाच जण जागीच ठार झाले आहे. दोन जणांची प्रकृती गंभीर असून जवळील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळाताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ रूग्णालयात हलवले.
 
  
पंढरपूरकडे जाणाऱ्या कारने (एमएच03 AZ 3116 ) एसटी बसला समोरून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.  अपघातात मृत्यू झालेले पाचही जण मुंबईतील आहेत.सध्या अपघातातील मृतांना सरकारी रुग्णालयात नेण्यात येत असून मृतांची ओळख पटविण्याच काम सुरू आहे.