सात मजली हॉस्टेलच्या गच्चीवरून पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
मोबाइलवर बोलत असताना गच्चीवरुन खाली पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अनिरुद्ध असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो हैदराबादमधील आयआयटीचा विद्यार्थी होता. सात मजली हॉस्टेलच्या गच्चीवर अनिरुद्ध मित्राशी बोलत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. पोलिसांना सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे संशय होते. मात्र नंतर ही दुर्घटना असल्याचं सिद्ध झाले.
अनिरुद्ध मेकॅनिकल अॅण्ड एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी मित्राचा मोबाइल फोन आला असता गच्चीवर गेला होता. यावेळी त्याचा तोल गेला आणि तो सात मजलीवरून खाली पडला. सुरुवातीला आम्हाला ही आत्महत्या असल्याचा संशय होता. पण जवळच्या एका सीसीटीव्हीत दिसत असल्याप्रमाणे मोबाइलवर बोलत असताना त्याचा तोल गेल्याचे स्पष्ट झाले. 
अनिरुद्धच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपविण्यात आला.