' आनंदी गोपाळ ' चित्रपटाचे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी हे नाव फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. यासाठी त्यांना अनेक अडचणींचा व संकटांचा सामना करावा लागणार. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचे लग्न वयाने तिप्पट असलेले गोपाळरावांशी झाले वयाच्या १४ व्या वर्षी प्रसूतीच्या वेळी वैद्यकीय संसाधने उपलब्ध नसल्याने आनंदीबाईना त्यांच्या पहिल्या मुलाला गमवावे लागले. त्याच क्षणाला त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरवले. गोपाळरावांनी सुद्धा आनंदीबाईना शिकवण्याचे ध्येय मनाशी बाळगले आणि तिच्या मागे खंबीरपणे उभे राहून तिचे प्रत्येक पाऊलावर समर्थन केले. आनंदीबाईंचा हा प्रेरणादायी जीवनप्रवास सिनेमाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकतेच 'आनंदी गोपाळ' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
 
 
 
 
 
 
 
सिनेमात ललित प्रभाकर गोपाळरावाची भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद आनंदीबाई जोशींच्या भूमिकेत दिसणार आहे . 'ज्या देशास माझा धर्म मान्य नाही, तो देश मला मान्य नाही’, असे दमदार डायलॉगस ट्रेलरमध्ये रसिकांची मनं जिंकतायेत. त्यांचा संपूर्ण प्रवास पाहण्यासाठी  १५ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.