अॅपलचे गोपनीय माहिती चोरी केल्याचे चिनी अभियेंतावर आरोप
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
जगप्रसिद्ध मोबाईल उत्पादक कंपनी अॅपलच्या गोपनीय प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रे चोरल्याच्या आरोपावरून एका चिनी अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील केंद्रीय तपास यंत्रणेने (एफबीआय) त्याच्या विरोधात कारवाई केली असून जिझोंग चेन असे या अभियंत्याचे नाव आहे. 
 
 
 आभियंतेवर अॅपलच्या स्वयंचलित कारशी संबंधित अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे चोरल्याचे आरोप आहे. चेन याला चीनला जाण्याच्या बेतात असताना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती, असे कॅलिफोर्नियातील न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी तक्रारीत म्हटले आहे. हे गोपनीय साहित्य बाहेर पडले असते तर अॅपलला प्रचंड मोठे नुकसान झाले असते, असे कंपनीने म्हटल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
 
 
या तक्रारीतील माहितीनुसार, चेन याला स्वयंचलित कारच्या कागदपत्रांची छायाचित्रे वाईड अँगल लेन्सने घेताना एका सहकाऱ्याने पाहिले होते. तेव्हा त्याच्याकडे पहिल्यांदा संशयाची सुई वळली होती. त्यानंतर अॅपलने केलेल्या चौकशीत त्याच्या वैयक्तिक संगणकात गोपनीय माहिती असलेल्या २००० पेक्षा अधिक फाईली सापडले. 
 
 
अॅपलच्या एखाद्या प्रकल्पाशी संबंधित साहित्याची चोरी करण्याच्या आरोपावरून चिनी नागरिकावर कारवाई होण्याची ही सहा महिन्यातील दुसरी घटना आहे.