पोटातील कॅन्सर निदान करणार सेन्सरची गोळी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
वॉश्गिंटन
 
पोटाच्या कर्करोग, जखमा व आतड्यांच्या संबंधित आजाराचे निदान करण्यासाठी मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाॅजी (एमआयटी)च्या इंजिनिअर्संनी एक गोळी तयार केली आहे. गोळीमध्ये एक सेन्सर बसवलेला असून ती पोटात जाताचा फुग्यासारखी होते . हे सेन्सर असलेली गोळी ३० दिवसापर्यंत पोटाच्या तापमानावर लक्ष ठेवते. 
 
 
एमआयटीचे सहायक प्राध्यापक जुआन्हे जाओ यांनी म्हटले, ही जेलीसारखी ही गोळी आहे. गिळल्यानंतर ती पोटातच राहते. रुग्णाच्या आजारावर लक्ष ठेवते. ही गोळी पोटातून बाहेर काढण्यासाठी कॅल्शियमचे द्रावण प्यावे लागते. यानंतर ती पहिल्यासारख्या आकाराची होते आणि पोटातून बाहेर पडते.