कोरियोग्राफर सलमान खान विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोचा विजेता आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर सलमान युसूफ खान याच्या विरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका महिलेने ३० जानेवारी रोजी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. 
 
 
 सलमान आणि त्याच्या भावावर महिलेने आरोप आरोप केले असून ती स्वतः कोरियोग्राफर आहे.  दुबईत डान्स शो करण्याची ऑफर देण्यासाठी सलमानने संबंधित महिलेला भेटण्यासाठी बोलावले आणि तिथे त्याने तिच्याशी गैरवर्तन केले. इंडस्ट्रीत अशा गोष्टी होत असतात असे सलमान म्हणाल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर दुबईतील डान्स शोचं काम दिल्यानंतर सलमान आणि त्याच्या भावाने मिळून बहरीन इथं गैरवर्तन केल्याचे आरोप महिलेने केले आहे.
 
महिलेने विरोध केले असता कामावरून काढण्याची धमकी सुद्धा सलमानने दिली होती.