धोनी पुनरागमनास सज्ज
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019

 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
- भारत-न्यूझीलंड पाचवा वन-डे सामना आज
- सामन्याचे स्थळः बेसिन रिझर्व्ह, वेिंलग्टन
- वेळ ः सकाळी 7.30 वाजतापासून
- थेट प्रक्षेपणः स्टार स्पोर्टस्‌ व डीडी स्पोर्टस्‌वर
वेिंलग्टन,
 
शनिवारी येथे न्यूझीलंडविरुद्धचा पाचवा व अंतिम सामना िंजकून भारताचे पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेवर 4-1 ने शिक्कामोर्तब करण्याचे लक्ष्य राहणार आहे. महेंद्र िंसह धोनीच्या पुनरागमनामुळे मवाळ झालेल्या भारतीय संघाचा पुन्हा आत्मविश्वास बळावला आहे.
या शेवटच्या सामन्यात खेळण्यास धोनी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी स्पष्ट केले आहे.
 
 
भारताचा सर्वाधिक अनुभवी कि‘केटपटू धोनी याच्या पायाचे स्नायू दुखावले गेल्याने दोन सामन्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. आता तो संघात परतला आहे. पाचव्या सामन्यापूर्वी धोनीने कसून सराव केला. विराट-धोनीच्या अनुपस्थितीत भारताला दारूण पराभव पत्करावा लागला होता. हॅमिल्टनमध्ये भारताचा डाव 92 धावात संपल्यानंतर धोनीचे पुनरागमन संघासाठी फलदायी ठरु शकेल.
 
 
वेिंलग्टनमध्ये भारतीय संघ 3-2 यापेक्षा 4-1 ने मालिका िंजकू इच्छित असेल, परंतु असे करण्यापेक्षा बोलणे सोपे राहणार आहे. आता केवळ भारताला आव्हानात्मक परिस्थितीत काही जबरदस्त स्वींग गोलंदाजी करून न्यूझीलंडला त्यांच्या सोयीच्या क्षेत्रातून बाहेर काढण्याची चमत्कारिक कामगिरी करावी लागणार आहे. भारताला ट्रेंट बोल्ट नावाच्या वादळाला रोखण्याची गरज राहणार आहे. कारण बोल्ट पुन्हा एकदा अशी प्रभावी कामगिरी करण्यास उत्सुक असेल.
 
 
धोनी परतल्यामुळे दिनेश कार्तिकला संघातून वगळण्यात येऊ शकते. विश्वचषकाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने पदार्पणात नऊ धावा करणार्‍या शुभमन गिलला आणखी संधी मिळण्याची शक्यता आहे. हॅमिल्टन सामन्यात अंबाती रायुडू, केदार जाधव व दिनेश कार्तिक आपल्या बॅटची चमक दाखविण्यात अपयशी ठरले होते. सर्वात खराब फलंदाजीचे प्रदर्शनापैकी एक आहे, अशा शब्दात रोहित शर्माने आपली नाराजी व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याने उत्कृष्ट प्रदर्शन करणे अपेक्षित आहे.
जर अंतिम अकरामध्ये मोहम्मद शमी परतला व भुवनेश्वर कुमारला विश्रांती मिळाली, तर रोमांचक ठरेल. संघ व्यवस्थापनसुद्धा मोहम्मद सिराजची चाचणी घेऊ इच्छित आहे. गत सामन्यात खलील अहमदचे प्रदर्शनही फारसे प्रभावी ठरले नाही.
 
 
या वन-डे मालिकेचा निकाल काहीही लागो, परंतु चौथ्या सामन्यात विजय मिळाल्याने न्यूझीलंड संघाला जणू संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे तेसुद्धा टी-20 मालिकेपूर्वी आणखी एक धमाकेदार प्रदर्शन करू इच्छिणार असतील.
गत सामन्यात हेनरी निकोल्सने नाबाद 30 धावा ठोकल्या, तर रॉस टेलरसुद्धा चांगला फॉर्मात असून त्याने गत दोन सामन्यात 93 व नाबाद 37 धावांची खेळी केली.
 
 
 
 
 
 

 
 
 
 
गप्टिलच्या दुखापतीमुळे िंचता
 
मात्र सलामी फलंदाज फलंदाज मार्टिन गप्टिल दुखापतीमुळे अखेरच्या वन-डे सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी अतिरिक्त सलामी फलंदाज म्हणून कोलीन मुनरोला पाचारण करण्यात आले आहे. गप्टिलच्या दुखापतीवर उपचार सुरू असून तो फिजिओच्या निरीक्षणाखाली आहे. सरावादरम्यान गप्टिलच्या कंबरेला दुखापत झाली. त्यामुळे अखेरच्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
 
 
प्रतिस्पर्धी संघ ः-
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, महेंद्र िंसह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, दिनेशकार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या.
 
 
न्यूझीलंड ः केन विल्यम्सन (कर्णधार), टॉड अॅस्टल, ट्रेंट बोल्ट, कोलीन डी ग‘ॅण्डहोम, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, मॅट हेनरी, टॉम लाथम (यष्टीरक्षक), कोलीन मुनरो, जिम्मी निशाम, हेनरी निकोल्स, मिशेल सॅण्टनर, टिम साऊदी व रॉस टेलर
 
 
 
 
 
 
 
.