भाजपाच्या लोकप्रियतेमुळेच ममता हिंसक बनल्या- पंतप्रधान मोदी यांचा घणाघात- बंगालमध्ये परिवर्तन होणारच
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
ठाकूरनगर/दुर्गापूर,
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इतक्या िंहसक का झाल्या, त्या भाजपा कार्यकर्त्यांवर सूड का उगवत आहेत, याचे कारण मला आज समजले. माझ्या सभेला झालेली इतकी प्रचंड गर्दी राज्यातील जनतेचे भाजपावरील वाढते प्रेमच दर्शविते. त्यामुळे ममता बॅनर्जींचा संताप होणे सहाजिकच आहे, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी येथे चढविला. ममतांच्या राज्यात गरिबांच्या स्वप्नांची पायमल्ली सुरू असून, आगामी निवडणुकांनंतर येथे परिवर्तन होणारच आहे, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
 
 
 
 
ममता बॅनर्जी भाजपावर इतक्या नाराज का आहेत, त्या आम्हाला सभा आणि रथयात्रांची परवानगी का नाकारत असतात, हे मला आजवर कळले नव्हते, पण आज मला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहे. माझ्या सभेला इतकी भव्य गर्दी झाली. तुमचे भाजपावरील प्रेम ममतांना कसे मान्य होईल. म्हणूनच त्या िंहसाचाराचा मार्ग स्वीकारतात, निष्पाप लोकांचे बळी घेतात, असा जोरदार चिमटा पंतप्रधानांनी काढला.
 
 
 
 
 


 
 
लोकशाही पायदळी तुडविण्याचे काम बंगालमध्ये आधी डाव्या आघाडीच्या सरकारने केले होते, त्याच मार्गावर आता ममता सरकारची वाटचाल सुरू आहे, पण लोकशाही तुडविण्यात डावे अपयशी ठरले होते, याचा विसर ममतांना पडला आहे. कितीही दडपशाहीचा वापर केला तरी, लोकशाही पायदळी तुडविणे तुम्हालाही शक्य होणार नाही, हे लक्षात ठेवा, असा इशारा पंतप्रधानांनी ठाकूरनगर आणि दुर्गापूर येथील विशाल जाहीर सभांमधून केला. या जाहीर सभांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी एकप्रकारे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराचे नारळच फोडले आहे.
 
 
 
एकमेकांना कारागृहात पाठविण्याच्या धमक्या देणारे, एकमेकांना पाण्यात पाहात आलेले लोक आता गळाभेट घेत आहेत. माझ्या सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व मार्ग बंद केले असल्याने, काही लोक मला रोज शिव्या देत असतात. मला त्याची पर्वा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
केंद्र सरकारने गेल्या साडेचार वर्षांच्या काळात बंगालच्या विकासासाठी 90 हजार कोटी रुपयांच्या पायाभूत विकास प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, पण आपल्या िंसडीकेटला आर्थिक लाभ मिळत नाही, तोपर्यंत काहीच करायचे नाही, असे धोरणच असलेल्या ममता सरकारने यातील एकाही प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला नाही, असा आरोप त्यांनी केला.
सामान्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला
बंगालमधील मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांचा ममता बॅनर्जी सरकारने चुराडा केला आहे. केंद्रातील भाजपा सरकारने मात्र नेहमीच मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी आणि महिलांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यावरच भर दिला आहे. शुक्रवारी संसदेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात याचेच प्रतििंबब आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
नागरिकत्व विधेयक पारित करणारच
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यासारख्या देशांमधून भारतात आलेल्या आणि सहा वर्षे वास्तव्य करणार्‍या िंहदू, शीख, जैन, पारशी यासारख्या धर्मातील नागरिकांना देशाचे नागरिकत्व मिळावे, यासाठी आम्ही नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणले आहे. त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही काय, असा सवाल करीत, या विधेयकाला तृणमूल कॉंगे्रसने पािंठबा द्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
गर्दी अनियंत्रित, काही जखमी
ठाकूरनगर येथील मोदी यांच्या सभेला इतकी विशाल गर्दी झाली होती की, अनेक जण समोर येण्यासाठी धडपडत होते. यामुळे चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली आणि यात काही जण किरकोळ जखमीही झाले. पंतप्रधानांनी नागरिकांना संयम राखण्याचा आणि कुणालाही इजा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. तथापि, गर्दी वाढतच असल्याने अखेर त्यांनी 15 ते 18 मिनिटांतच आपले भाषण आटोपते घेतले. ममता दीदींच्या तृणमूलचा मोदी द्वेषही या निमित्ताने बघायला मिळाला. अनेक ठिकाणी मोदी यांच्या पोस्टरवर तृणमूलचे पोस्टर लावण्यात आले होते, तर अनेक पोस्टर्सवर शाही फेकण्यात आली होती.