विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज - प्र-कुलगुरू - विद्यापीठात नॅकच्या नवीन निकष - बदलावर कार्यशाळा यशस्वी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
अमरावती,
विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विद्यापीठासह संलग्नित सर्व महाविद्यालयांना सामुहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा आय.क्यु.ए.सी. विभाग आणि रुसा, महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने नॅक मूल्यांकनाच्या सुधारित पध्दतीवर तीन दिवसीय अध्यापक विकास कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व तेथील आय.क्यु.ए.सी. समन्वयक यांचेकरिता विद्यापीठाच्या दृकश्राव्य सभागृहात करण्यात आले, कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन प्र-कुलगुरू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुणेचे डॉ. चंद्रकांत रावल व आय.क्यु.ए.सी. चे संचालक डॉ.एस.एफ.आर. खाद्री उपस्थित होते.
 

 
 
 
 
 
प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील शिखर संस्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षण अपेक्षित आहे, म्हणून शासनाने नॅक मूल्यांकन बंधनकारक केले आहे. आपल्या महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्याथ्र्यांना कसे देता येईल, यासाठी सर्व शिक्षक सातत्याने प्रयत्नरत राहून परिश्रम घेतील, असा वि·ाास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
 
 
 
विद्यापीठाचा पाच वर्षाचा बृहत आराखडा प्रसिद्ध झाला आहे, त्याला शासनाने मंजुरी दिली असून 2019-20 या शैक्षणिक वर्षात 55 नवीन महाविद्यालये, 24 महाविद्यालयांना नॅकचे मूल्यांकन, शैक्षणिक अंकेक्षण आदी महत्वपूर्ण बाबी त्यात नमूद आहेत, याचा विचार करुन सर्व महाविद्यालयांना नॅकसाठी पुढे यायचे आहे. लीड महाविद्यालयांची निवड करण्यात आली असून त्यांना इतर महाविद्यालयांना नॅकसाठी सहकार्य व मार्गदर्शन करायचे आहे, असेही ते म्हणाले. ही कार्यशाळा त्यादृष्टीने महत्वाची ठरली असून नॅकला सामोरे जाण्यासाठी महाविद्यालयांना सोयीस्कर झाले आहे. पुणेचे डॉ. चंद्रकांत रावल यांनी विद्यार्थी समर्थन आणि प्रगती, संस्थात्मक मूल्य आणि सर्वोत्तम पध्दती या निकषातंर्गत ‘संशोधन, नवकल्पना आणि विस्तार’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
 
 
 
 
सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागतानंतर प्रास्ताविक आय.क्यु.ए.सी. संचालक डॉ.एस.एफ.आर. खाद्री यांनी केले. याप्रसंगी विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचे डॉ.आर.एम. पाटील, श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, अकोलाचे डॉ. संजय विटे आणि श्री वसंतराव नाईक महाविद्यालय, धारणीच्या प्राचार्य डॉ.सौ.सी.के. देशमुख यांनी कार्यशाळेच्या उपयुक्ततेबाबत मनोगत व्यक्त केले. संचालन डॉ. निरज घनवटे यांनी, तर आभार डॉ. प्रशांत ठाकरे यांनी मानले. समारोपीय कार्यक्रमाला एल.एल.ई.चे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे विभागप्रमुख डॉ.एस.के. ओमनवार, डॉ. संजय डुडूल, डॉ.एस.डी. कतोरे, संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, आय.क्यु.ए.सी.चे समन्वयक आदी उपस्थित होते